Video: कोलकात्यात हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री जमावाचा हल्ला; रुग्णालयातील साहित्यासह गाड्यांची तोडफोड
Kolkata Doctor Murder : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ देशात अनेक ठिकाणी ‘रिक्लेम द नाईट’ नावाने निदर्शने सुरू झाली. या निदर्शनाला ‘रिक्लेम द नाईट’ अस नाव देण्यात आलं. काही वेळातच कोलकाता येथे आयोजित आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांच्या वेशात काही लोकांच्या गटाने आरजी कार मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश केला. (Doctor Murder) रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले आणि तोडफोड केली. या काळात अनेक वाहनांचेही नुकसान केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, हल्लेखोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवलं. दरम्यान, काही पोलीस अधिकारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे. या घटनेनंतर कॉलेज कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘रिक्लेम द नाईट’ मोहिमेसाठी निदर्शने बुधवारी रात्री 11:55 वाजता सुरू झाली. कोलकातामधील अनेक साइट्ससह लहान शहरं आणि मोठ्या शहरांच्या दोन्ही प्रमुख भागात पसरलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाशी निदर्शने केली गेली. त्यानंतर मध्यरात्री आंदोलकांच्या वेशात काही हल्लेखोरांनी कॉलेज कॅम्पसमध्ये घुसून तोडफोड सुरू केली.
Stock Market : वॉरेन बफे यांनी बाजारातून काढले 277 अब्ज डॉलर्स; शेअर बाजारावर मंदीचं संकट?
काल रात्री 1 च्या सुमारास सुमारे 500-1000 लोक येथे आले होते. येथे सुरक्षारक्षकांनी गेट बंद केले परंतु त्यांनी तेही तोडले गेलं. जमावाने मालमत्तेची तोडफोड केली संगणकापासून औषधांपर्यंत सर्व काही खराब केलं आहे. अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान केले असल्याचं येथील सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. तसंच, मोठा जमाव असल्याने सुरक्षारक्षकांनी काही करता आलं नाही.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये काल मध्यरात्री अनेक ठिकाणी 'रिक्लेम द नाईट' नावाने निदर्शने करण्यात आली. यामध्ये रुग्णालयातील साहित्यासह गाड्यांची तोडफोड केली.#KolkataDoctorDeath #kolkataviolence #KolkataDoctorCase pic.twitter.com/fnsgmEc9B9
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 16, 2024