डिलिमिटेशन विधेयकानंतर देशाचा निवडणूक नकाशा बदलणार; ‘या’ राज्यात एकही जागा वाढणार नाही?
Delimitation Bill 2026 : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व राज्यांमधील लोकसभा जागांची संख्या 50 टक्क्यांनी
Delimitation Bill 2026 : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व राज्यांमधील लोकसभा जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकार सोमवारी (30 नोव्हेंबर) लोकसभेत डिलिमिटेशन विधेयक आणणार आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावामुळे लोकसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे सध्याचे प्रमाण कायम राहणार आहे. सध्याच्या 543 लोकसभा जागांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ करून एकूण संख्या 850 (ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांसाठी 35 जागांचा समावेश आहे) केली जाणार आहे.
लोकसभेचे गणित कसे बदलेल?
मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावात (Delimitation Bill 2026) सर्व राज्यांच्या जागांमध्ये 50 टक्के वाढ सुचवण्यात आली आहे. मात्र, हे साध्य करणे तितके सोपे नाही. अनेक राज्यांच्या बाबतीत, 50 टक्के वाढ केल्यास मिळणारी संख्या पूर्णांकात येत नाही. उदाहरणार्थ, तामिळनाडूमध्ये जागांमध्ये 50 टक्के वाढ केल्यास ती संख्या 58.5 इतकी होते. मध्य प्रदेश (29 जागा), पंजाब (13 जागा) आणि दिल्ली (7 जागा) यांच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. या परिस्थितीत, तामिळनाडूला (पूर्णांकात) 59 जागा दिल्या जाऊ शकतात. जर हेच तत्त्व केंद्रशासित प्रदेशांनाही लागू केले, तर लोकसभेच्या एकूण जागांची संख्या 824 वर पोहोचेल.
दुसरीकडे, ज्या राज्यांमध्ये सध्या केवळ एक जागा आहे, तिथे ती वाढवून दोन केल्यास त्यात 100 टक्क्यांची वाढ होईल किंवा, ती एक जागा तशीच कायमही ठेवली जाऊ शकते. जर तसे झाले, तर लोकसभेच्या एकूण जागांची संख्या 816 असेल. प्रस्तावित सूत्रानुसार महाराष्ट्राच्या लोकसभा जागांची संख्या 48 वरून 72 होऊ शकते. उत्तर प्रदेशाच्या जागा 80 वरून 120, पश्चिम बंगाल 42 वरून 63, बिहार 40 वरून 60, तर तमिळनाडूच्या जागा 39 वरून 59 होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या जागा 29 वरून 44, कर्नाटक 28 वरून 42, गुजरात 26 वरून 39, राजस्थान आणि आंध्र प्रदेश प्रत्येकी 25 वरून 38, तर केरळच्या जागा 20 वरून 30 होऊ शकतात.
तर दुसरीकडे अंदमान-निकोबार, चंदीगड, लडाख, लक्षद्वीप, मिझोराम, नागालँड, पुदुच्चेरी आणि सिक्कीम यांसारख्या ठिकाणी सध्या प्रत्येकी एक लोकसभा जागा आहे. 50 टक्के वाढीचे सूत्र लागू करताना या जागा दोन करायच्या की सध्याची एकच जागा कायम ठेवायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याच्या प्रस्तावित गणितात काही ठिकाणी एकच जागा कायम ठेवण्याची शक्यता आहे.
Details of Proposed Delimitation Bill;
Current seats: 543
Proposed seats: 815
Uniform state seat increase: 50%
Population Representation ratio: Unchanged.
Considering all aspects, it’s a good deal offered to Southern States by the govt. https://t.co/CNhXKxLthY
— PVS Sarma – పి వి ఎస్ శర్మ – પી વી એસ શર્મા (@pvssarma) November 27, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे लोकसभेत आठ खासदार आहेत. हे खासदार ‘डिलिमिटेशन’ (Delimitation) प्रक्रियेच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ही प्रक्रिया संसदेत आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याशी संबंधित आहे, ज्याला 2023 मध्ये सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने सशर्त मंजुरी मिळाली होती. पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने संकेत दिले आहेत की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील एका गटाचे असे मत आहे की, संसदेत या विधेयकाला अधिकृतपणे पाठिंबा देण्यापूर्वी सत्तेच्या वाटपाचे सूत्र (power-sharing formula) निश्चित केले जावे.