माझा विवाह झाला नाही ही देवाचीच कृपा; मेरठच्या सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य

माझा विवाह झाला नाही ही देवाचीच कृपा; मेरठच्या सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य

Dhirendra Shatri Statement on Merath Saurabh Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधील इंदिरा नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून त्याची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. येथे एका पत्नीने तिच्या प्रियकरासह (Meerut Saurabh Murder Case) मिळून पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी (Muskaan Rastogi) आणि प्रियकर साहिल शुक्ला (Sahil Shukla) याला अटक केली आहे.यावर आता थेट बागेश्वर धामचे पिठाधिश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री?

या घटनेवर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, भारतात निळा ड्रम खुप प्रसिद्द झाला आहे. मात्र त्यामुळे अनेक पती घाबरलेले आहेत. पण देवाची कृपाच म्हणावी लागेल की, माझा विवाह झाला नाही. मेरठचं हे हत्याकांड अत्यंत दुर्दैवी आहे. सध्याच्या काळात ढासळत चाललेली कुटुंब व्यव्यस्था, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि प्रेमाच्या नादाला लागलेले विवाहित स्त्री- पुरूष यामुळे एकतर घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत किंवा हत्याकांड होत आहेत. असं वक्तव्य बागेश्वर धामचे पिठाधिश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे.

नेमकी घटना काय?

उत्तर प्रदेशातील मेरठमधील इंदिरा नगरमध्ये सौरभ राजपूत यांची पत्नी मुस्कान रस्तोगी (Muskaan Rastogi) आणि प्रियकर साहिल शुक्ला यांनी मिळून हत्या केली आहे. माहितीनुसार, सौरभ राजपूत (Saurabh Rajput) आणि मुस्कान रस्तोगी यांची प्रेमकहाणी 2016 मध्ये लग्नापर्यंत पोहोचली मात्र या लग्नाला सौरभच्या कुटुंबियांकडून विरोध होता मात्र तरीही देखील सौरभने मुस्कानशी लग्न केले. त्यानंतर दोन्ही मेरठमधील इंदिरा नगरमध्ये भाड्याने राहू लागले. सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह काही वर्षे चांगला चालला पण त्यानंतर या नात्यात दुरावा येऊ लागला.

कुणाल कामराला दहशतवादी संघटनाकडून पैसे, उदय सामंतांनी केली मोठी मागणी

सौरभ मर्चंट नेवीमध्ये होता मात्र लग्नानंतर त्याने नोकरी सोडली आहे लंडन येथे काही काम करु लागला. याच काळात मुस्कानच्या आयुष्यात साहिल शुक्लाची एंट्री झाली. सुरुवातीला दोघात मैत्री झाली नंतरप्रेम. तर 26 फेब्रुवारी रोजी सौरभ मेरठला मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला. 28 फेब्रुवारी रोजी मुलीचा वाढदिवस साजरा केला. मात्र त्यापुर्वीच मुस्कान आणि साहिलने सौरभला मारण्याचा कट रचला होता.

कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ; शंभूराज देसाई संतप्त

4 मार्चच्या रात्री सौरभ झोपेत असताना रात्री 1 च्या सुमारास मुस्कानने साहिलला कॉल करुन घरी बोलवले आणि त्यानंतर दोघांनी मिळून सौरभवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सौरभचा मृत्यू झाला. यानंतर मुस्कान आणि साहिलने सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले आणि त्यावर सिमेंट टाकून ड्रम पूर्णपणे बंद केला.

हत्येनंतर शिमला गाठलं

सौरभची हत्या केल्यानंतर मुस्कान तिच्या प्रियकार साहिल शुक्लासोबत शिमला पोहचली. यापूर्वी तिने शेजारच्या लोकांना पतीसोबत हिमाचलला जात असल्याची खोटी माहिती दिली . मात्र त्यानंतर घरी आल्यानंतर मुस्कानने तिच्या आईला घटनेबद्दल सांगितले. यानंतर 17 मार्च रोजी मुस्कानच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, मुस्कान सौरभला घटस्फोट देऊ इच्छित होती, परंतु सौरभ यासाठी तयार नव्हता. त्यामुळे मुस्कान आणि साहिलने सौरभच्या हत्येता कट रचला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube