DMK खासदाराला ईडीचा दणका! ठोठावला 908 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

DMK खासदाराला ईडीचा दणका! ठोठावला 908 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

S Jagatrakshan : ईडीने (ED) बुधवारी एक मोठी कारवाई करत डीएमकेचे (DMK) खासदार एस जगतररक्षक (S Jagatrakshan) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 908 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच बरोबर ईडीकडून खासदार एस जगतररक्षक यांची 89.19 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. माहितीनुसार, डीएमकेचे खासदार एस जगतररक्षक यांनी विदेशी चलन कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात ईडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील फेमा (FEMA) कायद्यांतर्गत खासदार आणि व्यापारी जगतरक्षक यांच्या विरोधात चौकशी करण्यात आली होती. यावेळी ईडीकडून त्याच्या कुटुंबाशी संबंधित संस्थांचीही चौकशी करण्यात आली होती.  आता त्यांची फेमा कायद्याच्या कलम 37A अंतर्गत त्यांची 89.19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याच बरोबर त्यांना 908  कोटींच्या वसुलीची नोटीसही ईडीकडून बजावण्यात आली आहे.

एस जगतररक्षक तामिळनाडूमधील अरकोनमचे (Arkonam) खासदार आहे. तसेच ते तमिळनाडूतील एक प्रसिद्ध उद्योगपतीही आहेत. सध्या ईडीकडून 89 कोटी रुपयांच्या भांडवली मालमत्तेसह त्यांची एकूण जंगम आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2020 मध्ये फेमा कायद्यांतर्गत खासदार एस जगतररक्षक यांची 89.19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार आज (28 ऑगस्ट) रोजी एस जगतररक्षक यांची 89.19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

गृहविभागाचा आदेश, रायसोनी प्रकरणात IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल

फेमा कायद्यांतर्गत 11 सप्टेंबर 2020 रोजी खासदार एस जगतररक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या अनेक जंगम आणि जंगम मालमत्तेसाठी जप्तीचा आदेश पारित करण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube