धक्कादायक! फ्लाइटमध्ये पुन्हा प्रवाशाने केली लघुशंका, गुन्हा दाखल
न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला (Delhi Airport) येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने (Drunken passenger) सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना समोर आली आहे. डीजीसीएने (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सने सहप्रवाशांचे जबाब नोंदवून आरोपी प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक कायद्याच्या अदखलपात्र गुन्ह्याखाली कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनाची तक्रार दिल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, त्या व्यक्तीने लघवी केल्याचे कोणतेही साक्ष किंवा तक्रार सह-प्रवाशांनी केली नाही.
अमेरिकन एअरलाइन्सने सांगितले की, न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या फ्लाइट क्रमांक 292 मध्ये ही घटना घडली आली. रविवारी रात्री 9 च्या सुमारास विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर CISF ने आरोपीला ताब्यात घेतले आहे. रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन
यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली
मद्यधुंद प्रवाशांकडून विमानात असभ्य वर्तनाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने ७० वर्षीय महिला प्रवाशावर लघवी केली होती.
तसेच 6 डिसेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या पॅरिस-नवी दिल्ली फ्लाइटमधील एका प्रवाशाने रिकाम्या सीटवर आणि सह महिला प्रवाशाच्या आसनावर आणि ब्लँकेटवर लघवी केली होती.