रंगाचा बेरंग! आणखी एक राऊंड म्हणत मद्यपींनी चौघांना उडवलं, मुलीसाठी रंग घेणाऱ्या आईचा मृत्यू

रंगाचा बेरंग! आणखी एक राऊंड म्हणत मद्यपींनी चौघांना उडवलं, मुलीसाठी रंग घेणाऱ्या आईचा मृत्यू

Drunks car hits four mother dies buying Colour for daughter : सध्या राज्यासह देशभरात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्येच मद्यधुंद तरुणाई आणि त्यांच्याकडून रस्त्यांवर केले जाणारे अत्यंत गैरवर्तन त्याच्या देखील घटना वारंवार घडताना दिसत आहेत. एकीकडे पुण्यातील भर रस्त्यात सिग्नलवर अश्लील वर्तन करणाऱ्या मुलाची घटना ताजी असतानाच आता गुजरातमधील वडोदरा येथून अशाच प्रकारच्या मद्यपी तरुणांनी चौघांना उडवल्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी! पाकिस्तानात आणखी एक आयसीसी टूर्नामेंट; वेळापत्रकही जाहीर

गुजरातच्या वडोदरा शहरामध्ये एका वीस वर्षीय तरुणाने त्याच्या कारने चौघांना चिरडलं. ज्यामध्ये एका महिलेच्या जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साडेबाराच्या आसपास करेली बाग या भागात घडली. या घटनेच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

‘रंगकर्मी धुळवड २०२५’ मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण…

या व्हिडिओमध्ये हा कारचालक तरुण प्रचंड नशेमध्ये आहे. चौघांना चिरडल्यानंतर तो कारमधून उतरतो आणि म्हणतो की, आणखी एक राउंड. यावेळी आसपासच्या लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच जखमी अवस्थेत पडलेले लोक रस्त्यावर देखील तसेच पडलेले होते. रक्षित चौरसिया असे या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी आहे. तो सध्या वडोदरा येथील एका युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या आणखी एक आरोपी जो कारचा मालक मीत चौहान आहे. जो ही घटना घडताना चौरसिया या आरोपीच्या सोबत होता. या दोघांनाही सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

तर या घटनेमध्ये एका आईचा अत्यंत करून अंत झाला आहे. ही महिला होळीनिमित्त आपल्या मुलीसाठी रंग खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती. यावेळी या कारणे तिला चिरडलं. त्या अपघातामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन होळीच्या दिवशी या मुलीच्या आणि महिलेच्या आयुष्याचा बेरंग झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube