Download App

भूकंपाच्या धक्क्यांनी तिबेट हादरलं! उत्तर प्रदेश-बिहारपर्यंत जाणवले धक्के, मध्यरात्री लोकं गाढ झोपेत असतानाच…

Earthquake In Tibet Magnitude 5 7 On Richter Scale : तिबेटमधून मोठी बातमी समोर येत (Earthquake) आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे 2.41 वाजता (भारतीय वेळेनुसार) तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असल्याचं वृत्त समोर येतंय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी होती. एनसीएसच्या मते, भूकंपाचे केंद्र तिबेट प्रदेशात होते. परंतु, अजूनपर्यंत कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानाची माहिती (Earthquake In Tibet) मिळालेली नाही. भूकंपाचा परिणाम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्येही (Bihar) जाणवला असल्याची माहिती मिळतेय.

Video : …तर काय उत्तर मिळेल हे पाकिस्तानला माहीत आहे; भारतीय नौदलाने ‘हवाच’ काढली

माहिती देताना एनसीएसने सांगितले की, ते या भागातील भूगर्भीय हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहेत. त्याच वेळी, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क आहेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. आज मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास तिबेटमध्ये मोठा भूकंप (Tibet Earthquake) जाणवला. यामुळे तिबेट हादरले आहे. भूकंप इतका जोरदार होता की, मध्यरात्री झोपलेल्या तिबेटी लोकांना भीतीने घराबाहेर पळावे लागले. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.

ऑपरेशन सिंदूर : भारताला काय मिळालं, पाकिस्तानचं किती नुकसान? 12 पॉइंट्समध्ये घ्या जाणून..

उत्तर भारतातील अनेक भागात, विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांनी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केले, जिथे काहींनी सौम्य भूकंपांबद्दल बोलले, तर काहींनी या धक्क्यांना भयानक म्हटलं आहे. भूकंपाचा परिणाम त्याचा परिणाम उत्तर प्रदेश-बिहारपर्यंत दिसून आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याची माहिती मिळतेय.

एनसीएसने म्हटलंय की, या भूकंपाचे केंद्र तिबेटमध्ये होते. त्याची तीव्रता मध्यम ते जास्त होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हिमालयीन प्रदेश भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे अशा घटना वेळोवेळी घडत राहतात. एनसीएसने असेही म्हटले आहे की, ते या भागातील भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. जेणेकरून कोणत्याही धोक्याचे वेळेत मूल्यांकन करता येईल.

 

follow us