चिनी कंपनी Vivo वर ईडीची मोठी कारवाई, कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यासह चौघांना अटक

  • Written By: Published:
चिनी कंपनी Vivo वर ईडीची मोठी कारवाई, कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यासह चौघांना अटक

ED Action On Vivo : गेल्या काही दिवसांत ईडीकडून (ED) मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी, कारवाया केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी महादेव गेमिंग अॅप प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ईडीनं समन्स पाठवलं होतं. तर आता ईडीने चिनी कंपनी असलेल्या व्हिवो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (VIVO INDIA PRIVATE LIMITED) विरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक केली. यामध्ये लावा इंटरनॅशनल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचाही समावेश आहे.

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या; कुत्र्यावर हल्ला करुन केली शिकार… 

लावा इंटरनॅशनल ही भारतीय मोबाईल कंपनी आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे .ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी नागरिक अँड्र्यू कुआंग, लावा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक हरिओम राय आणि चार्टर्ड अकाउंटंट राजन मलिक आणि नितीन गर्ग यांना अटक करण्यात आली आहे.

व्हिवो कंपनी बऱ्याच दिवसांपासून ईडीच्या आणि प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहे. याआधी ईडीने सुमारे वर्षभरापूर्वी व्हिवो मोबाईल कंपनीवर छापा टाकला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीचा भारतातील कमाईचा अहवाल कमी दिसून येत आहे. उत्पन्न आणि नफाच्या आकड्यांत फेरफार केल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळं ही कारवाई करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत ED चा तपास सुरू करण्यात आला. जीपीआयसीपीएलवर फसवणूक, आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने केला होता. या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे

गेल्या वर्षी ईडीने विवो मोबाईलशी संबंधित 48 ठिकाणी छापे टाकले होते. कंपनीशी संबंधित 23 कंपन्यांच्या व्यवहारांची चौकशी करून 465 कोटी रुपये जप्त केले होते. ईडीच्या मते विवोची स्थापन 2014 रोजी झाली. तर ग्रॅंड प्रोस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिकेशन ही Vivo शी संबंधित कंपनी आहे.

जीपीआयसीपीएल या कंपनीची स्थापन नितीन गर्ग, झेंगशेन ओऊ, बिन लू यांनी केली होती. ही कंपनी स्थापन करताना अनेक नियमांची पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे कंपनीची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

ED ने आरोप केला आहे की, Vivo मोबाइल कंपनीने भारतात कर भरू नये म्हणून 62,476 कोटी रुपयांची मोठी रक्कम अवैध मार्गान चीनला पाठवली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube