अमेरिकेतील प्रत्येक मुलाला मिळणार ‘स्पेस एक्स’ चे 2 शेअर्स; इलॉन मस्क यांची मोठी घोषणा

Elon Musk SpaceX Shares for Children: अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चे 2 शेअर्स देण्याची घोषणा इलॉन मस्क यांनी केली आहे.

Elon Musk SpaceX Shares for Children

Elon Musk SpaceX Shares for Children: अमेरिकेतील प्रत्येक मुलाला ‘स्पेस एक्स’ (SpaceX) कंपनीचे 2 शेअर्स देण्याची घोषणा कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी केली आहे. यातील एक शेअर कंपनीकडून, तर दुसरा शेअर मस्क स्वतः देणार आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील लाखो मुलांना स्पेस एक्स कंपनीत भागीदारी मिळणार आहे. तसेच भविष्यात या शेअर्सच्या माध्यमातून त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो.

‘बीव्हीजी’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटींची मदत; हणमंतराव गायकवाड यांनी फडणवीसांकडे सुपूर्द केला धनादेश

मस्क यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून ही माहिती दिली. अमेरिकेतील प्रत्येक मुलाला दोन शेअर्स मिळतील, असे त्यांनी सांगितले. याआधी स्पेस एक्स ने प्रत्येक सक्रिय ‘ट्रम्प अकाउंट’मध्ये कंपनीचा एक शेअर जमा करण्याची घोषणा केली होती. आता कंपनी जेवढे शेअर्स देईल, तेवढेच शेअर्स मस्क स्वतःच्या पैशातून देणार आहेत.

काय आहे ‘ट्रम्प अकाउंट’?

अमेरिकेतील मुलांच्या भविष्यासाठी ‘ट्रम्प अकाउंट’ नावाची विशेष गुंतवणूक खाती तयार करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये पैसे किंवा गुंतवणूक जमा करून मुलांसाठी दीर्घकालीन बचत करता येते. या खात्यांना करसवलतही मिळते.

IFFIमध्ये चित्रपटांसोबत खाद्यसंस्कृती, कला आणि मनोरंजनाचीही मेजवानी; सर्जनशील उपक्रमांनी महोत्सव परिसर गजबजला

स्पेस एक्स कडून दिले जाणारे शेअर्स या खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत. मात्र, मस्क स्वतः देणार असलेले शेअर्सही याच खात्यांमध्ये जमा होतील का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हे शेअर्स मिळाल्यानंतर लगेच विकता येतील की काही काळ विक्री करता येणार नाही, याबाबतही कंपनीने माहिती दिलेली नाही.

मुलांना कंपनीचे भागधारक बनवण्याचा उद्देश

स्पेस एक्स ने सोशल मीडियावर पोस्ट करून लाखो अमेरिकन मुलांना प्रत्येकी एक शेअर देण्याचे आश्वासन दिले आहे. भविष्यातील विकासात मुलांनाही कंपनीचे भागधारक म्हणून सहभागी करून घेण्याचा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

स्पेस एक्सचे उद्दिष्ट मानवाला पृथ्वीबाहेरील इतर ग्रहांवरही राहता यावे, असे आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगतीमध्ये नव्या पिढीलाही सहभागी करून घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

या आधीही मस्क यांनी केली होती घोषणा

गेल्या महिन्यातही इलॉन मस्क यांनी अमेरिकेतील प्रत्येक मुलाला स्पेस एक्सचा एक शेअर देण्याची घोषणा केली होती. भविष्यातील अर्थव्यवस्थेत लोकांना थेट भागीदारी मिळायला हवी. त्यासाठी लोकांच्या हातात थेट शेअर्स देणे हा योग्य मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले होते.

‘मी कोणाची लेक आहे, हे विसरू नका’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

दरम्यान, बुधवारी नॅस्डॅक (अमेरिकेतील एक मोठे शेअर बाजार) बाजारात स्पेस एक्सचा एक शेअर 127 डॉलरवर बंद झाला होता. आता मस्क यांच्या घोषणेनंतर अमेरिकेतील मुलांना हे शेअर्स नेमके कधी आणि कोणत्या अटींवर मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

follow us