1999 मध्ये 6 हजार पगार… 2026 मध्ये घरी ईडीचा छापा, पाच घरं, 13 भूखंड अन् दोन कोटी रोकड, इंजिनिअर अटक
या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड (कॅश), सोन्याचे दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
ओडिशातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ED) लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली आहे. शनिवारी त्यांनी एका सरकारी इंजिनिअरच्या घरी धाड टाकली. त्यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी एका सहाय्यक अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या छाप्यात जप्त झालेली रोकड आणि बेनामी संपत्ती पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सरकारी इंजिनिअरकडे २ कोटींचा कॅश, आलिशान घरे आणि फ्लॅट्स आढळल्याने तपास अधिकारीही थक्क झाले.
ओडिशातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली आहे. येथे एका सरकारी इंजिनिअरच्या घरी धाड टाकली. त्याने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी एका सहाय्यक अभियंत्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या छाप्यात जप्त झालेली रोकड आणि बेनामी संपत्ती पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सरकारी इंजिनिअरकडं २ कोटींचा कॅश, आलिशान घरे आणि फ्लॅट्स आढळल्याने तपास अधिकारीही थक्क झाले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने शनिवारी कंधमालातील बालिगुडा येथील एकात्मिक आदिवासी विकास संस्थेत कार्यरत असलेले सहायक कार्यकारी अभियंता बैकुंठ नाथ बेहरा यांच्या घरी धाड टाकली. त्यांच्या निवासस्थानी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई केली.या छाप्यात अभियंत्याच्या बँक लॉकरमधून २ कोटींहून अधिक रुपयांची रोकड आणि कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, कोर्टाने बैकुंठ नाथ बेहरा यांच्याविरोधात एक वॉरंट जारी केले होते, त्यानुसार आम्ही एकाचवेळी ९ ठिकाणी ठापे टाकले. यामध्ये भुवनेश्वरमधील नीलाद्री विहार, शैलाश्री विहार, कानन विहार आणि चंद्रशेखरपूर येथील निवासस्थाने, तसंच जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा येथील त्यांचे वडिलोपार्जित घर, बारीपाडा येथील नातेवाईकांची घरे, बालिगुडा येथील त्यांची कार्यालयातील खोली आणि शासकीय निवासस्थान यांचा समावेश होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड (कॅश), सोन्याचे दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
अधिकाऱ्याने सांगितले की, कोर्टाने शुक्रवारी बैकुंठ नाथ बेहरा यांच्याविरोधात एक वॉरंट जारी केले होते, त्यानुसार आम्ही एकाचवेळी ९ ठिकाणी ठापे टाकले. यामध्ये भुवनेश्वरमधील नीलाद्री विहार, शैलाश्री विहार, कानन विहार आणि चंद्रशेखरपूर येथील निवासस्थाने, तसेच जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा येथील त्यांचे वडिलोपार्जित घर, बारीपाडा येथील नातेवाईकांची घरे, बालिगुडा येथील त्यांची कार्यालयातील खोली आणि शासकीय निवासस्थान यांचा समावेश होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड (कॅश), सोन्याचे दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.