EPFO : ‘सिंगल पूल’ नुसार होणार ETF मध्ये गुंतवणूक; खाताधारकांच्या रिटर्नवर होणार थेट परिणाम
सध्या, EPFO त्यांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या गुंतवणूक चक्रांचे अनुसरण करते
What Is EPFO Single Pool Scheme : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या गुंतवणूक पद्धतीत मोठा बदल करणार आहे. EPFO ने त्यांच्या विविध योजनांच्या निधीचे एकत्रीकरण करून एकच सामाईक पूल (सिंगल पूल) तयार करण्याची योजना तयार केली आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या, EPFO त्यांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या गुंतवणूक चक्रांचे अनुसरण करते, ज्यामुळे कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता नव्या सिंगल पूल स्किममुळे ईपीएफओ अब्जावधी रुपयांचे सहज आणि अचूक व्यवस्थापन करू शकणार आहे.
EPFO Rules : लग्नासाठी PF मधून किती पैसे काढू शकतात? जाणून घ्या हे नियम
पाच वेगवेगळ्या योजनांचा असेल एकच फंड
ईपीएफओ सध्या EPF, EPS आणि EDLI यासह त्यांच्या पाच प्रमुख योजनांसाठी स्वतंत्र निधी व्यवस्थापित करते. मात्र, नव्या योजनेनुसार या सर्व योजनांसाठी एकच सिंगल पूल असेल. यामुळे ईपीएफओला ETF मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुलभ होईल. याशिवाय 25 कोटींपेक्षा जास्त थेट व्यवहारांना लागू असलेल्या सेबीच्या नियमांचे पालन करणे देखील सोपे होणाप असून, सिंगल पूल फंडमुळे ट्रान्झॅक्शन कॉस्टदेखील कमी होण्याची अपेक्षा आहे.
वार्षिक आधारावर होणार गुंतवणूक
आतापर्यंत, ईपीएफओ प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेपासून पुढील महिन्याच्या 19 तारखेपर्यंत मासिक गुंतवणूक चक्र चालवत होती. मात्र, ही जुनी पद्धत रद्द करून वार्षिक आधारावर गुंतणूक करण्याचा ईपीएफओ विचार करत आहे.यामुळे फंड मॅनेजरला बाजारातील अस्थिरतेला तोंड देण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. यामुळे केवळ एका महिन्याच्या डेटावर अवलंबून राहण्याऐवजी, वर्षभरातील बाजार कामगिरीच्या आधारे गुंतवणूकीचे निर्णय घेणेदेखील फंड मॅनेजरला मदतगार ठरेल, ज्यामुळे दीर्घकाळात चांगले परतावे मिळण्याची शक्यतेतदेखील वाढ होऊ शकते.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EPFO मध्ये मोठा बदल, नॉमिनीला मिळणार 50,000 रुपये
परफॉर्मन्ससाठी नवीन SOP
ईपीएफओ गुंतवणुकीसाठी एक नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) विकसित करत आहे. ज्यात बाजारातील चढउतारांचा पूर्ण फायदा घेता यावा यासाठी फंड मॅनेजरसाठी वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. याशिवाय, फंड मॅनेजरसाठी परफॉर्मन्स लिंक्ड इंसेंटिव सुरू केले जाऊ शकतात. या संपूर्ण योजनेवर येत्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत चर्चा केली जाणार असून, सिंगल पूल लागू स्किमबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
