Epstein Files : होय, माझे दोन रशियन महिलांशी प्रेमसंबंध..,;एपस्टिनशी संबंधांवर बिल गेट्स यांची कबुली…
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एपस्टिन फाईल्स संबंधित प्रकरणावर कबुली देत माफी मागितली आहे.
Epstein Files and Bill Gates Confession : जगभरात एकच खळबळ माजवणाऱ्या एपस्टीन फाईल्सबद्दल नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात अनेक दिग्गजांच्या नावाचा उल्लेख होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी हे धक्कादायक ठरत आहे. असं असतानाच आता मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी या प्रकरणावर कबुली देत माफी मागितली आहे.
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीतच पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, बीड जिल्ह्यातील घटना
बिल गेट्स यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर त्यांनी आता गेट्स फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी मागितलीयं. एपस्टिनशी संबंधित नवीन कागदपत्रे प्रसिद्ध झाल्यानंतर बिल गेट्स यांनी माफी मागितलीयं.
रॉयटर्सशी फाउंडेशनच्या प्रवक्त्याने शेअर केलेल्या निवेदनानुसार, गेट्स यांनी अलीकडेच टाऊन हॉलच्या बैठकीत एपस्टीनशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दलच्या प्रश्नांना उत्तर दिले. टाऊन हॉलमध्ये, गेट्स यांनी एपस्टीनन फाइल्समध्ये उल्लेख आढल्याप्रमाणे दोन रशियन महिलांशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले आहे. एवढंच नाहीतर त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, हे प्रेमसंबंध एपस्टीनच्या पीडितांशी संबंधित नव्हते.
पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये अग्नि वर्षा सराव; 25 देशांतील पत्रकार सहभागी
दरम्यान, अमेरिकेच्या न्याय विभागाने त्यांच्या आणि एपस्टीन यांच्यातील अनेक बैठकांचे फोटो प्रसिद्ध केल्यापासून गेट्स टीकेला सामोरे जात आहेत. कागदपत्रांमध्ये बिल गेट्स हे ज्या महिलांचे चेहरे अस्पष्ट होते त्यांच्यासोबत पोज देतानाही दिसत होते.
