100 मोदी, 100 शहा आले तरी 2024 ला काँग्रेसच सत्तारूढ होणार; खरगेंचा दावा

  • Written By: Published:
100 मोदी, 100 शहा आले तरी 2024 ला काँग्रेसच सत्तारूढ होणार; खरगेंचा दावा

नागालॅंड : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) डोळ्यासमोर ठेवून सर्वच प्रमुख पक्षांनी लोकसभा जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची एकही जागा निवडून येणार नसून, भाजपमुक्त महाराष्ट्र होणार आहे, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला. तर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केला आहे. खरगे हे मंगळवारी नागालँडमध्ये एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी 100 मोदी आणि 100 शहा आले तरी 2024 मध्ये केंद्रात काँग्रेसचं सत्तारूढ होणार असल्याचे ते म्हणाले.

खरगे म्हणाले की, ‘2024 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधक भाजपला सत्तेवरून खाली खेचतील. आम्ही इतर पक्षांशीही याबाबत बोलत आहोत, अन्यथा देशातील लोकशाही आणि संविधान संपुष्टात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहासारखे वागत असल्याचेही खरगे म्हणाले.

मोदी-भाजपबद्दल खरगे यांनी मांडलेले चार महत्तचे मुद्दे –

1. जनतेने मोदींना निवडून दिले, 2024 मध्ये तेच धडा शिकवतील
खरगे म्हणाले, ‘मोदी अनेकदा म्हणतात की, ते देशाला तोंड देणारी एकमेव व्यक्ती आहे. त्यांना या देशातील अन्य कोणी दुसरा व्यक्ती स्पर्शही करू शकत नाही. खरंतर असं कोणीही लोकशाहीवादी व्यक्ती म्हणू शकत नाही. तुम्ही लोकशाहीत आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही हुकूमशहा नाही. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले तेच तुम्हाला 2024 मध्ये धडा शिकवतील.

2. आम्ही संविधान आणि लोकशाहीसोबत जाऊ

ते म्हणाले की, ‘केंद्रात आघाडीचे सरकार येणार आणि काँग्रेस त्याचे नेतृत्त्व करेल. आम्ही इतर पक्षांशी बोलत आहोत. आम्ही लोकांशी बोलत असतो, त्यांच्याशी आमच्या कल्पना शेअर करत असतो. आम्ही 2024 च्या निवडणुका कशा जिंकायच्या याबद्दल बोलत आहोत. आता भाजप बहुमतात येणार नाही. इतर पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवू. आम्ही संविधान आणि लोकशाहीसोबत जाऊ.

शिवसेनेच्या बैठकीतला ठराव, सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश मराठीमध्ये वाचून दाखवतात तेव्हा…

3. काँग्रेसच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्राण दिले, भाजपने नाही
खरगे म्हणाले, ‘100 मोदी आणि शहा येऊ द्या, हा हिंदुस्थान आहे. आपल्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले आहेत. काँग्रेसवाल्यांनी जीव दिला. भाजपच्या लोकांनी दिले नाही. मला भाजपचा असा एक तरी व्यक्ती दाखवा, जो स्वातंत्र्यासाठी लढला आणि तुरुंगात गेला.

4. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गांधींची त्यांनी हत्या केली
ते म्हणाले की, ‘जो माणूस स्वातंत्र्यासाठी लढत होता…ते महात्मा गांधी…. त्यांना या लोकांनी मारले. असे लोक देशभक्तीच्या गप्पा मारत असतात. ज्यांनी जीव घेतला तेच आम्हाला आता देशभक्ती शिकवत आहेत. इंदिराजी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आपले प्राण दिले. भाजपमध्ये कोणत्या नेत्याने देशहितासाठी आपले प्राण त्यागले, असा सवालही यावेळी खरगे यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, 2014 मध्येच स्वातंत्र्य मिळाले असे भाजपच्या लोकांना वाटते, त्यांना 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याचाही भाजपवाल्यांना विसर पडल्याची टीका खरगेंनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube