Payal Gaming डीपफेक व्हिडिओ प्रकरणात गुन्हा दाखल; व्हिडिओची होणार फॉरेन्सिक चौकशी
Payal Gaming Video Case : यूट्यूबर पायल गेमिंग गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर पायल
Payal Gaming Video Case : यूट्यूबर पायल गेमिंग गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर पायल गेमिंगचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने पायल गेमिंग चर्चेत आहे. तर आता या प्रकरणात मोठी अपडेटसमोर आली आहे. पायल गेमिंगने या प्रकरणात कायदेशीर करावाई करत महाराष्ट्र सायबर विभागात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने (Maharashtra Cyber Department) या प्रकरणात पुढील कारवाई देखील सुरु केली असून व्हायरल डीपफेक व्हिडिओची फॉरेन्सिक चौकशी देखील सुरु करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात महाराष्ट्र सायबर विभागाने पायलचा व्हिडिओ (Payal Gaming Video Case) डीपफेक असल्याचे म्हटले आहे.
या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरु करण्यात आली असून तपासात असे दिसून आले की, व्हिडिओ एआय वापरुन तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जाणूनबुजून व्हायरल करण्यात आला होता. पोलिसांनी आता हा व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या सर्वांवर कारवाई सुरू केली आहे.
View this post on Instagram
Bollywood Movies 2025 : ईयर एंडर 2025: ‘क्रेझी’पासून ‘होमबाउंड’पर्यंत, 7 अंडररेटेड हिंदी चित्रपट
सायबर विभागाने प्रमाणपत्र जारी केले
महाराष्ट्र सायबर विभागाने पायल गेमिंगला एक प्रमाणपत्र देखील दिले आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की पायलचा हा व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे आणि डीपफेक वापरून तयार करण्यात आला आहे. सायबर विभागाची पथक आता हा व्हिडिओ कुठे तयार केला आणि तो कोणी तयार केला आणि सोशल मीडियावर कोणी पसरवला याचा तपास करत आहे. पायलचा हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तिने अधिकृत निवेदन जारी करून हा व्हिडिओ एआय असल्याचे सांगितले होते आणि लोकांना तो पसरवू नका असे आवाहनही केले होते.
