दिल्ली विमानतळावर ‘स्विस एअर’ च्या विमानातील इंजिनला आग; 6 प्रवासी जखमी

Delhi Airport : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, दिल्लीहून झुरिचला जाणारे

Delhi Airport

Delhi Airport : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, दिल्लीहून झुरिचला जाणारे ‘LX147’ हे विमान उड्डाणासाठी तयार असताना उड्डाण प्रक्रियेदरम्यान, विमानाच्या पहिल्या क्रमांकाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला, ज्यामुळे त्या इंजिनने पेट घेतला. ज्या क्षणी इंजनाला आग लागली त्या क्षणी पायलटने उड्डाण तात्काळ रद्द करत विमान धावपट्टीवरच थांबवले. त्यावेळी विमानात 232 प्रवासी उपस्थित होते.

तर दुसरीकडे या घटनेनंतर संपूर्ण विमानतळावर इमरजेंसी जाहीर करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. दैनिक जागरण च्या एका वृत्तानुसार, इंजिनला आग लागून विमान थांबताच, प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. आपत्कालीन ‘स्लाईड्स’च्या (Emergency Slides) साहाय्याने बाहेर पडत असताना अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या. जखमी प्रवाशांना ‘मेदांता रुग्णालयात’ दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा परिणाम म्हणून, दिल्ली विमानतळावरील ‘धावपट्टी क्रमांक 28’ (Runway 28) तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली.

अर्चना पूरण सिंग यांचा मुलगा आयुष्मान ‘क्रेडिट कार्ड स्कॅम’चा बळी; गमावले 87 हजार-

विमान कंपनीने बाधित प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि पर्यायी विमानांची व्यवस्था केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘संकट निवारण केंद्र’ (Crisis Management Center), एक विशेष समिती आणि बचाव पथक यांना कामावर जुंपण्यात आले आहे. यापूर्वीही दिल्ली विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांवर आदळल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय, आपत्कालीन लँडिंगच्या (Emergency Landings) अनेक घटनांची नोंद झाली आहे.

follow us