Video : शांत चालत आला अन् लगातार 10 राउंड फायर केले; गोळीबाराचा थरारक व्हिडिओ व्हायरल

  • Written By: Published:
Video : शांत चालत आला अन् लगातार 10 राउंड फायर केले; गोळीबाराचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Gym owner shot at in Delhi : दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलाश भागात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. (Gym) या घटनेत जिमच्या बाहेर उभ्या संचालकावर गोळीबार करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव नादिर शाह असे सांगितलं जात आहे. त्याला ३ ते ४ गोळ्या लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान रात्री झालेल्या या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार; घटनेने परिसरात तणाव

या हत्याकांडात एक वेगळाच ट्विस्ट समोर आला असून या हत्येची जबाबदारी गँगस्टर रोहित गोदारा यांनी घेतली असल्याने हा प्रकार गँगवॉरमधून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीचे डीसीपी (दक्षिण) अंकित चौहान यांनी सांगितलं की, रात्री १०.४५ वाजता आम्हाला ग्रेटर कैलाशच्या ई-ब्लॉकमध्ये फायरिंग झाल्याचा पीसीआर कॉल आला. नादिर शाह नावाचा व्यक्ती जो पार्टनरशीपमध्ये जीम चालवत होता, त्याला गोळ्या लागल्या होत्या. ७ ते ८ राउंड फायर करण्यात आले.

पीडित नादिर शाह याला गंभीर अवस्थेत त्याचे मित्र रुग्णालयात घेऊन गेले. येथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. संबंधीत कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कारवाई केली जात आहे. प्रकरणाच्या तपासासाठी पाच टीम तयार केल्याचे देखील त्यांनी सांगितले. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार गँगस्टर रोहित गोदारा यांने सोशल मीडियावर एख कथित पोस्टच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्विकारलीआहे. यापूर्वी गोदरा याने लॉरेन्स बिश्नोईसोबत मिळून कॅनडामधील व्हँन्कूव्हर आयलंड येथे पंजाबी गायक एपी ढिल्लनच्या घरावर झालेल्या गोळीबाराची देखील जबाबदारी घेतली होती.

केजरीवालांना जामीन मिळताच पवारांची सूचक पोस्ट; म्हणाले, एखाद्याला नामोहरम करण्याचा कट

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नादिर शाह जिमच्या बाहेर उभा होता, तेव्हा तब्बल १० राऊंड फायर केल्याचा आवाज ऐकू आला . याघटनेनंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नादिर शाह हा गुन्हेगारी जगाशी संबंधीत राहिलेला आहे आणि पोलिसांना संशय आहे की ही घटना गँगवॉरशी संबंधीत असू शकते. गोळीबार का झाला याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या