पेपरफुटीसाठी अन् संघटित गुन्हेगारी! शपथ घेताच भजनलाल शर्मांचे धडाकेबाज निर्णय

पेपरफुटीसाठी अन् संघटित गुन्हेगारी! शपथ घेताच भजनलाल शर्मांचे धडाकेबाज निर्णय

जयपूर : भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमध्ये संघटित गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठीअँटी गँगस्टर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणि आगामी परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी तत्काळ प्रभावाने एसआयटीही स्थापना करण्यत आली आहे. (formation of SIT and anti gangster task force in paper leak case in Rajasthan)

पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी याबाबतचे स्वतंत्र आदेश जारी केले. अतिरिक्त पोलीस महासंचालक (तांत्रिक सेवा) व्ही के सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. हे पथक पेपरफुटी प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यांची चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करेल. शिवाय गुन्हेगारांच्या मालमत्तेचाही तपास करणार आहे. या तपास पथकात एक पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, अधिक्षक, चार अतिरिक्त अधिक्षक, आठ उपाधिक्षक, 10 निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 10 हेड कॉन्स्टेबल आणि 15 कॉन्स्टेबल, कॉम्प्युटर ऑपरेटर अशा 50 जणांचा समावेश असणार आहे.

Road Accident : भीषण अपघात! भरधाव वेगातील ट्रक हॉटेलात घुसला; तिघांचा जागीच मृत्यू

त्याचप्रमाणे राज्यातील संघटित गुन्ह्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी राज्यस्तरावर अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक (गुन्हे) दिनेश एमएन यांच्या नेतृत्वाखाली विशेष अँटी गँगस्टर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ही टीम मानवी आणि तांत्रिक माहिती गोळा करेल आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेईल. यासोबतच त्यांचा डेटाबेस तयार करून आणि प्रभावी कायदेशीर कारवाईची करुन विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांवर देखरेख ठेवणार आहे.

या तपास पथकात एक अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रत्येकी एक पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, अधिक्षक, दोन अतिरिक्त अधिक्षक, चार उपाधिक्षक, 10 निरीक्षक, 12 उपनिरीक्षक, 40 हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अशा 65 जणांचा समावेश असणार आहे.

राहुल गांधी पुन्हा अडचणीत, अमित शाहांवर टीका केल्याने समन्स जारी

संघटित गुन्हेगारी अन् पेपरफुटीचे प्रकरण :

राजस्थानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये संघटित गुन्हेगारी आणि पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच गाजला. कन्हैयालाल हत्या प्रकरणाचं भांडवलं करण्याबरोबरच भाजपनं राजस्थानमध्ये पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसला कोंडीत पकडले होते. याच मुद्द्यावरून सचिन पायलट यांनीही निवडणुकीपूर्वी आपल्याच सरकारला कोंडीत पकडत पेपरफुटीच्या चौकशीची मागणी केली होती. आता अखेर या दोन्ही प्रकरणात भजनलाल शर्मा यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube