Delhi News: 1984 च्या शीख दंगलीतील काँग्रेसच्या माजी खासदाराची निर्दोष सुटका
1984 Sikh riots : 1984 च्या शीखविरोधी दंगलीत एका व्यक्तीच्या हत्येशी संबंधित खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी वेदप्रकाश पियाल आणि ब्रह्मानंद गुप्ता या दोन अन्य आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली, कारण त्यांच्यावरील खून आणि दंगलीचे आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरले.
सुलतानपुरी येथे झालेल्या घटनेत शीख नागरिक सुरजीत सिंग यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश म्हणाले, “आरोपी सज्जन कुमारला संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.” सज्जन कुमारवर भारतीय दंड संहितेच्या कलम 153A (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. कलम 109 (गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे), कलम 302 (हत्या) आणि कलम 147 (दंगल) नुसार नोंदवले.
सज्जन कुमार तिहारमध्ये बंद आहे
31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती, त्यानंतर दंगली उसळल्या होत्या. दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सज्जन कुमार सध्या तिहार तुरुंगात आहेत. 17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दंगलीशी संबंधित एका प्रकरणात सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला, मात्र प्रत्येक वेळी त्यांची याचिका फेटाळण्यात आली.
हिंदूंनो, कॅनडा सोडून भारतात जा; खलिस्तानी-दहशतवाद्याने कॅनडास्थित भारतीयांना धमकावलं
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने सज्जन कुमारची याचिका फेटाळली होती ज्यात त्याने प्रकृतीचे कारण देत कोर्टाकडे जामीन मागितला होता. सज्जन कुमार यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मागितली होती. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की, तुमच्याकडे सुपर व्हीआयपी म्हणून पाहिले जाऊ शकत नाही.