लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यपालांचे खांदेपालट; दिल्लीतील मोठे नेते राज्यात पाठवले

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यपालांचे खांदेपालट; दिल्लीतील मोठे नेते राज्यात पाठवले

Odisha New Governor: 2024 लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने काही राज्यातील राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghuvar Das) यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंद्र सेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy Nallu) यांना त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने आज (बुधवारी) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या नियुक्त्या करण्यात आनंद होत आहे. पुढे असे लिहिले आहे की दास आणि नल्लू ज्या तारखेपासून कारभार स्वीकारतील त्या तारखेपासून दोन्ही पदावरील नियुक्त्या प्रभावी होतील.

पुन्हा राजकीय भूकंप! अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा

रघुवर दास सध्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 2014 ते 2019 पर्यंत ते झारखंडचे मुख्यमंत्री होते. इंद्र सेना रेड्डी नल्लू हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असून तीन वेळा आमदार राहिले आहेत. ते आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत.

तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका आहेत. सध्या राज्यात केसीआर यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती (BRS) सरकार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याच दिवशी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराममध्येही मतमोजणी होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube