PM Modi Cabinet : मोठी बातमी! मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा; नेमकं कारण काय

PM Modi Cabinet : मोदी सरकारमधील चार मंत्री पुढील काही दिवसात राजीनामा देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ

PM Modi Cabinet

PM Modi Cabinet : मोदी सरकारमधील चार मंत्री पुढील काही दिवसात राजीनामा देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोराने सुरु असून आता सरकारमधील चार मंत्री राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने गुरुवार 4 जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर चार मंत्री राजीनामा देणार असं सांगितलं जात आहे.

भाजपने जाहीर केलेल्या या यादीत केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू (Ravneet Singh Bittu) आणि जॉर्ज कुरियन (George Kurian) यांचा समावेश नाही. मोदी मंत्रिमंडळातील एकमेव ख्रिश्चन मंत्री असलेले कुरियन हे सध्या मध्य प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत. काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये आलेले केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार करण्यात आले होते. या दोन्ही मंत्र्यांचा कार्यकाळ संपत आला असला तरी, भाजपने (BJP) त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही.

या घडामोडींमुळे मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान या दोघांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीच दोन मंत्र्यांवर पक्षांतर्गत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. भाजपने पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली तर हर्ष मल्होत्रा यांच्याकडे दिल्ली भाजपची धुरा सोपवण्यात आली.

बुरुडगाव कचरा डेपोतील सोलर प्रकल्प वादळी वाऱ्यामुळे कोलमडला; 500 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प

भाजपच्या या नियमामुळे आगामी विस्तारादरम्यान या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकेल. संसदीय नियमांनुसार, 21 जून रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही, या मंत्र्यांना जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीत लोकसभा किंवा राज्यसभेवर निवडून यावे लागेल.  या मधल्या काळात ते आपले मंत्रिपद सांभाळू शकतात.

follow us