G-20 Summit : ’31 ड्रोन ते मुक्त व्यापार’; अमेरिका ब्रिटनकडून भारताला काय काय मिळालं?

G-20 Summit : ’31 ड्रोन ते मुक्त व्यापार’; अमेरिका ब्रिटनकडून भारताला काय काय मिळालं?

नवी दिल्लीत पार पडलेल्या G20 शिखर परिषदेचा समारोप झाला असून या परिषदेच्या माध्यमातून भारताला अनेक नवनवीन गोष्टी मिळाल्या आहेत. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हजेरी लावली होती. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी काही महत्वपूर्ण करारासंबंधी चर्चा झाली असून कराराच्या माध्यमातून भारताला अनेक गोष्टी मिळणार आहेत.

Ira Khan: ‘आत्महत्येचा विचार…’, आमिरच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अमेरिकेत असलेल्या अॅटॉमिक्स MQ-9B विमाने ही विमाने भारताला मिळणार असून हे विमाने एक प्रकारचे ड्रोन आहेत, या ड्रोनच्या माध्यमातून गुप्तचर माहिती गोळा करण्यास मदत होते. G-20 परिषदेनंतर अमेरिकेकडून भारताला 16 हवाई गुप्तचर ड्रोन आणि 15 सागरी ड्रोन देण्यास मान्यता मिळाली आहे.

G20 Summit 2023: G20 शिखर परिषदेसाठी 4 हजार 254 कोटींहून अधिक खर्च, संपूर्ण तपशील पाहा

एवढंच नाहीतर अमेरिका भारतात मायक्रोचिप तंत्रज्ञानासाठी 300 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असून सूक्ष्म उद्योगांमध्येही 400 दशलक्ष डॉलर्सची गुतंवणूक केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. यावेळी भारतामध्ये गुंतवणूक आणि ड्रोन देण्यास मान्यता मिळाली आहे.

काहींना वाटले सुट्टी घेतली तर संपले, पण मी संपणाऱ्यातील नाही; पंकजांचा रोख नेमका कोणावर?

G-20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान, भारत-ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करण्यासंदर्भातील करारावर चर्चा झाली आहे. दोन्ही देशांतील संबंध दृढ व्हावेत, त्यासाठी लवकरात लवकर करार पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

राजकारण तापलं! विखेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 51 हजारांचं बक्षीस; मल्हार सेना आक्रमक

दरम्यान, भारताच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच झालेल्या G-20 शिखर परिषद पार पडली असून जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या G-20 शिखर परिषदेचा रविवारी अखेर समारोप झाला. समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलला सुपूर्द केले असून नोव्हेंबरपासून ब्राझील औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=rlwffoiEfxw

भारतात 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी हाय-प्रोफाइल G20 गटांचे नेते राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले होते. G20 गटात 19 सर्वात श्रीमंत देश आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश असून दिल्लीतील प्रगती मैदानावर पार पडलेल्या दोन दिवसीय शिखर परिषदेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि नऊ अतिथी देशांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube