तब्बल 19 अब्ज डॉलर्सचे शेअर विकले; विदेशी गुंतवणूकदार भारताला सोडून चाललेत कुठे ?
Global Funds -गेल्या तीन महिन्यात विदेशी फंडसने भारतीय शेअर बाजारातून 18.84 अब्ज डॉलर्स किंमतीच्या शेअर्सची विक्री केलीय.
Global Funds Selling-जागतिक अनिश्चितेमुळे विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री केलीय. अमेरिका-इस्रायल व इराण संघर्षाचा मोठा फटका शेअर बाजाराला बसला आहे. युद्धामुळे कच्चे तेल आणि गॅसच्या किंमतीत झालेली वाढ हे याचे मुख्य कारण आहे. कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि गॅसच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला भविष्यात मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूक म्हणजे ग्लोबल फंड भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत.
गेल्या तीन महिन्यात विदेशी फंडसने भारतीय शेअर बाजारातून 18.84 अब्ज डॉलर्स किंमतीच्या शेअर्सची विक्री केलीय. गेल्या तीन महिन्यात ही सर्वात मोठी विक्री आहे. 2025 मध्ये विदेशी फंडसने भारतीय बाजारातून तब्बल 18.79 अॅब्ज डॉलर्सचे शेअरची विक्री केली होती. या दोन्ही आकडेवारीवरून भारतीय अर्थव्यवस्थेवर आता विदेशी गुंतवणूकादारांचा विश्वास राहिलेला नाही. ही आकडेवारीची माहिती सीडीएसएल (CDSL) नुसार आहे. ग्लोबल फंड्सच्या सातत्यपूर्ण विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव आहे. इराण-इस्रायल युद्ध संपेल, अशा सकारात्मक गोष्टी घडत असताना भारतीय शेअर बाजारात दबाव दिसून येत आहे. शेअर्सची विक्री वाढलेली आहेत. गेल्या वर्षी भारतीय शेअर बाजार उच्चांकावर होता. परंतु गेल्या तीन महिन्यापासून बाजारात सातत्याने पडझड होत आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे तब्बल 600 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.
गुंतवणूकदारांचा एआय (AI) अर्थव्यवस्थेकडे ओढा
विदेशी फंड्स आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’शी संबंधित अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करत आहेत. सेमीकंडक्टरच्या वाढत्या मागणीचा फायदा या देशांना होईल, असे त्यांना वाटते. यामुळे 4.8 लाख कोटी डॉलर बाजार मूल्य असलेल्या भारतीय शेअर बाजाराचे विदेशी गुंतवणूकदारांना आता आकर्षण राहिलेले नाहीत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण, कंपन्यांचा घटता नफा यामुळे विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून काढता पाय घेत आहेत. पुन्हा विदेशी गुंतवणूकदार हे भारतीय बाजाराकडे आकर्षित होतील, अशी परिस्थिती नसल्याचे गुंतवणूकदार सांगत आहेत.
याबाबत मनी कंट्रोल हिंदीला दिलेल्या माहितीत डीएनबी एसेट मॅनेजमेंटचे पोर्टफिलोओ मॅनेजर अभिषेक थेपाडे म्हणतात, भारतीय कंपन्यांचे शेअर्स सध्या आकर्षक वाटत नाहीत. कंपन्यांचे उत्पन्न घडत आहे. चक्रीय मंदी (Cyclical Slowdown) दिसून येत आहे. रुपयाची कमकुवत स्थिती आणि एआयचा भारतीय आयटी कंपन्यांवर होणारा परिणाम यामुळे भारतीय बाजाराचे आकर्षण कमी झाले आहे.
देशांतर्गत गुंतवणुकीचा आधार
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार या महिन्यात आतापर्यंत दक्षिण कोरिया आणि तैवानच्या शेअर बाजारात विदेशी फंड्सनी अनुक्रमे 3.6 अब्ज डॉलर आणि 5.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. याच काळात भारतीय बाजारात मात्र 3 अब्ज डॉलरची विक्री झाली आहे. तर सुदैवाने, भारतीय बाजाराला देशांतर्गत गुंतवणूकादारांनी तारले आहे. म्युच्युअल फंड आणि वित्तीय संस्थांनी यावर्षी भारतीय बाजारपेठेत 31 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलीय.