रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 78 दिवसांचा बोनस मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 78 दिवसांचा बोनस मिळणार

Railways employees : दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या 11 लाखांहून (Railways employees) अधिक बिगर गॅझेट कर्मचाऱ्यांना गिफ्ट (Diwali Bonus) दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅझेट नसलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 11 लाख 340 रेल्वे कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सरकारी तिजोरीवर 1969 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांइतका बोनस देण्यास मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने गैर-राजपत्रित रेल्वे कर्मचार्‍यांना 78 दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने उत्पादकता लिंक्ड बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा हा बोनस महागाईच्या या काळात त्यांना मोठा दिलासा देणार आहे.

Prabhas Wedding: प्रभासचं ठरलं! ‘बाहुबली’ फेम लवकरच चढणार बोहल्यावर?

1100340 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलेल्या बोनसचा या सणासुदीच्या हंगामात अर्थव्यवस्थेला फायदा झाला तर मागणी वाढण्यास मदत होईल. 78 दिवसांसाठी उत्पादकता लिंक्ड बोनस देण्यासाठी 1969 कोटी रुपये लागतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube