लष्कराच्या ताफ्यात दाखल झालं Gypsy चं SUV इलेक्ट्रिक मॉडेल; जाणून घ्या खास गोष्टी
Maruti Gypsy Electrical New SUV In Indian Army : मारुती जिप्सी, ज्याने अनेक दशके भारतीय रस्त्यावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता ती पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक आली आहे. ही नवीन जिप्सी खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आली आहे, जी भारतीय लष्कर, आयआयटी दिल्ली आणि टॅडपोल प्रोजेक्ट्स नावाच्या स्टार्टअपने रीट्रोफिट केली आहे. गेल्या शुक्रवारी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये (ACC) या मारुती जिप्सी इलेक्ट्रिकचे प्रदर्शन करण्यात आले. ACC हा द्विवार्षिक कार्यक्रम आहे आणि भारतीय सैन्याच्या सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे.
Tadpole Projects स्टार्टअपने या ऑपरेशनमागे काम केले आहे, हे स्टार्टअप आयआयटी-दिल्ली अंतर्गत येते. या स्टार्टअपच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Tadpole Projects मुख्यत्वे विंटेज कार आणि जिप्सी यांच्याशी संबंधित आहे. हे स्टार्टअप जुन्या व्हिन्टेल कार्सचे रीट्रोफिट देखील करते, ज्याद्वारे जुन्या गाड्या सुधारित केल्या जातात आणि नवीन पद्धतीने तयार केल्या जातात.
किसान सभा आक्रमक; महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर राज्यव्यापी पायी मोर्चा
या इलेक्ट्रिक जिप्सीच्या मूळ डिझाइनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, जरी ‘EV’ बॅजिंग आणि भारतीय लष्कराचा लोगो एसयूव्हीवर देण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की या मारुतीजिप्सीला इलेक्ट्रिक अवतारमध्ये रूपांतरित करण्यासाठी 30 किलोवॅट क्षमतेचा किट वापरण्यात आला आहे, जो एका चार्जमध्ये 120 किलोमीटरपर्यंत जाते.
‘जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला, आरक्षण दिले नाहीतर मुख्यमंत्र्यांना…’ मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
मारुती जिप्सीचा भारतीय लष्कराशी खूप जुना संबंध आहे, ही SUV अनेक दिवसांपासून लष्कराच्या सेवेत आहे. कंपनीने डिसेंबर 1985 मध्ये पहिल्यांदा मारुती जिप्सी सादर केली होती, त्यावेळी ही SUV भारतीय बाजारात 970 cc F10A सुझुकी इंजिनसह लॉन्च करण्यात आली होती. सुरुवातीला, हे फक्त सॉफ्ट-टॉप म्हणून उपलब्ध होते, परंतु नंतरचे हार्डटॉप लोकप्रिय झाल्यानंतर हार्डटॉपसह ऑफर केले गेले. कंपनीने 2018 मध्ये अधिकृतपणे उत्पादन बंद केले.