‘जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला, आरक्षण दिले नाहीतर मुख्यमंत्र्यांना…’ मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

‘जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला, आरक्षण दिले नाहीतर मुख्यमंत्र्यांना…’ मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Maratha Kranti Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्यावतीने शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन केलं.

सत्तेत आल्यावर मराठा समाजाल आरक्षण देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पण त्याची पुर्तता अजूनही झाली नसल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देऊन विठ्ठलाच्या महापुजेला यावं नाहीतर आषाढीच्या महापुजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखू असा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

रामभाऊ गायकवाड म्हणाले की आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी अपेक्षा होती. मराठा चेहरा मुख्यमंत्री आहे म्हणून आरक्षण भेटलं पण एकनाथ शिंदे यांनी फार मोठी निराशा केली आहे. पंढरपूर आषाढीवारीचे आम्ही लवकरच उदाहरण देऊ पण सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्हाला जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला आरक्षण दिले नाही तर मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापुजा करुन देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे कार्यक्रर्ते रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

Satyapal Malik : सत्यपाल मलिक पोलिसांच्या ताब्यात, राज्यपाल असतांना मलिक गप्प का होते? शाहांचा सवाल

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला मोठा धक्का बसला होता. मराठा आरक्षणाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालायाने ही याचिका फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मराठा आरक्षण मिळण्याची शक्यता आता कमी झाली आहे.


मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गैरसमज करून घेऊ नका. जस्टीस भोसले कमिटीने जेव्हा रिव्हू पीटीशन दाखल केली होती तेव्हाच त्यांनी संगितलं होतं की, यामध्ये स्कोप कमी असतो. तसेच ही पीटीशन दालनामध्ये फोटळण्यात आली आहे. त्यावर अर्ग्युमेंट झालेलं नाही. तसेच भोसले कमिटीने ज्या काही सूचना केल्या आहेत. त्यावर सरकार काम करत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube