हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरले; घटनेत 25 जण जखमी, मदतकार्य सुरू

हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरले; घटनेत 25 जण जखमी, मदतकार्य सुरू

Howara-CSMT Express Train : हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस ट्रेनचे डब्बे रुळावरून घसरून मोठा अपघात झाला आहे. चक्रधरपूरजवळ ट्रेन रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. ARME आणि ADRM CKP पथक घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य सुरु झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत २५ जण अपघातात जखमी झाले आहेत. . त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12810 (हावरा-सीएसएमटी एक्स्प्रेस) झारखंडच्या चक्रधरपूर विभागाच्या राजखरस्वन वेस्ट आउटर आणि बाराबांबू दरम्यान रुळावरून घसरली आहे. सकाळी ३.४५ वाजता ही घटना घडली आहे.

हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरून घसरल्यानंतर ते दुसऱ्या रुळावरील मालगाडीला धडकले. या अपघातामध्ये आतापर्यंत २५ जण जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना चक्रधरपूरमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

धक्कादायक! पतीने इंजेक्शन देऊन साखळदंडाने बांधलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात सापडली महिला

अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. जवळपास १० डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बातमी अपडेट होत आहे- 

इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत’ भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या