1 सप्टेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठा बदल; मोबाईलवरील ई-बोर्डिंग पासवरच इमिग्रेशन क्लिअरन्स

नव्या व्यवस्थेनुसार प्रवासी मोबाईलमध्ये सेव्ह केलेला ई-बोर्डिंग पास इमिग्रेशन काउंटरवर दाखवून क्लिअरन्स घेऊ शकतील.

News Photo   2026 08 22T135236.877

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या (Journey) प्रवाशांसाठी 1 सप्टेंबर 2026 पासून मोठा बदल लागू होणार आहे. देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी प्रवाशांना यापुढे फिजिकल बोर्डिंग पास दाखवण्याची किंवा त्यावर इमिग्रेशनची मुहर घेण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रवाशांना मोबाईलमध्ये असलेला ई-बोर्डिंग पास दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बोर्डिंग पासची प्रिंटेड कॉपी सोबत बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.

नव्या व्यवस्थेनुसार प्रवासी मोबाईलमध्ये सेव्ह केलेला ई-बोर्डिंग पास इमिग्रेशन काउंटरवर दाखवून क्लिअरन्स घेऊ शकतील. यामुळे बोर्डिंग पासची फिजिकल कॉपी जपून ठेवणे आणि त्यावर इमिग्रेशनची मुहर घेण्याची प्रक्रिया टाळता येणार आहे. इमिग्रेशन प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था लागू करण्यात येत आहे.

इथेनॉलमुळं साखर महाग झाली का?, सर्वसामान्यांच्या खर्चावर किती परिणाम?, सरकारने काय दिलं स्पष्टीकरण?

मात्र, ज्या प्रवाशांकडे फिजिकल बोर्डिंग पास असेल, त्यांनाही कोणतीही अडचण येणार नाही. असे प्रवासी प्रिंटेड बोर्डिंग पाससह प्रवास करू शकतील. मात्र, नव्या व्यवस्थेनंतर फिजिकल बोर्डिंग पासवर इमिग्रेशनची मुहर मारली जाणार नाही. म्हणजेच प्रवाशांना प्रिंटेड बोर्डिंग पास ठेवण्याची मुभा असली तरी इमिग्रेशन प्रक्रियेसाठी त्यावर शिक्का घेणे आवश्यक राहणार नाही.

या नव्या डिजिटल व्यवस्थेबाबत ब्युरो ऑफ इमिग्रेशनने देशातील विमानतळ ऑपरेटर, संबंधित भागधारक आणि CISFला माहिती दिली आहे. नव्या पद्धतीनुसार आवश्यक तयारी करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. 1 सप्टेंबर 2026 पासून देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ही व्यवस्था लागू होणार असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कागदी प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Tags

follow us