गृहमंत्र्यांच्या आदेशाने विद्यार्थ्यांवर गोळीबार; लोकसभेत राहुल गांधींच्या गंभीर आरोप, भाजपकडून जोरदार आक्षेप, कामकाज तहकूब
लोकसभेत पेपरफुटीविरोधातील कायद्याच्या दुरुस्तीविधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला.
नीट पेपरसह देशातील इतर परीक्षा प्रश्नपत्रिका (Neet) फुटीविरोधातील कायदा दुरुस्ती विधेयकावर कालपासून लोकसभेत घमासान चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत आज धुरळा उडवून दिला. त्यांनी पोलिसांना विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर एकच गदारोळ उठला.
सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांनी या दाव्याच्या पुष्ट्यार्थ पुरावा देण्याची आग्रही भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यानंतर गोंधळ वाढला. राहुल गांधी यांनी आपला माईक बंद करण्यात आल्याचा आरोप केला. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज तहकूब केले.
विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त हे उदाहरण देताच सत्ताधाऱ्यांनी एकच गोंधळ केला. विरोधी पक्षनेते असंसदीय शब्द वापरत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांचे आंदोलन हा राग नव्हता. द्वेष तर नव्हताच नव्हता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांचा राग हा योग्य होता, असे राहुल गांधी म्हणाले. देशाने पण तरुणाची भाषा समजली पण सरकारला त्यांची भावना उमगली नाही असंही ते म्हणाले.
एकतर माफी मागा, नाहीतर पुरावे द्या; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून किरेन रिजिजूंचा कडक इशारा
राहुल गांधी म्हणाले की देशाचे भविष्य रस्त्यावर उतरले. मी विचार करत होतो की कुठून भाषण सुरू करु. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भावना दिसत होती. तरुणांचा राग हिंसा कशी? भाजप नेत्यांनी त्यांच्या मुलांना विचारावं, असे राहुल गांधी म्हणाले.
लोकसभेत पेपरफुटीविरोधातील कायद्याच्या दुरुस्तीविधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला. या देशाच्या भविष्याने रस्त्यावर उतरून जे काही केले, तो ना राग होता ना, द्वेष ना, हिंसा. तर तो या देशातील तरुणाईचा आवाज होता.
सर्व राजकीय पक्षांनी तरुणांच्या आवाजाचा सन्मान करायला हवा. त्यात भाजपमधील माझे मित्रांचा पण समावेश आहे. भाजपमधील माझ्या मित्रांनी, त्यांच्या मुलांना विचारावे की, त्यांचे भाऊ-बहीण काय करत होते. तर ते सांगितील की त्यात काहीच चूक नाही. प्रत्येक भारतीयाला तसे करायला हवे. मी ही गोष्ट सर्वांसमोर ठेवली आहे.
राहुल गांधी यांनी सांगितले की, विद्यार्थी हा सत्यासाठी धावत आहे. विद्यार्थ्यांसाठी सत्य हे गोड असते. मी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. आमचे विद्यार्थी, शिक्षण व्यवस्था, खर्चाची माहिती देते होते. 8-10 तास मुलं अभ्यास करतात असे राहुल गांधी म्हणाले.