ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा

  • Written By: Published:
ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा

India-Pakistan Agreed For Full And Immediate Ceasefire Says Donald Trump : भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचेमिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील असेही मिस्त्री यांनी यावेळी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच केली होती घोषणा

मिस्त्री यांच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती केल्याचा दावा केला होता. याबाबत ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली होती. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हे जाहीर करताना त्यांना आनंद होत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान तात्काळ शस्त्रसंधीची सहमती दर्शवल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

ट्रम्प यांची पोस्ट नेमकी काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन.

पाकिस्ताननेही केली युद्धबंदीची पुष्टी

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. यात त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. तथापि, भारतावर हल्ला करण्याच्या अयशस्वी प्रयत्नांबद्दल त्यांनी माफी मागितली नाही. त्यांनी पुढे असा दावा केला की, पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube