India Q1 GDP : भारत विकास’रथा’वर! तिमाहीतील विकासदर सर्वाधिक
India GDP : भारताचा आर्थिक विकास वेगाने होत असल्याचे गेल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीवरून समोर समोर आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या 7.8 विकासदर नोंदविण्यात आला आहे. काही रेटिंग एजन्सींना कमी विकासदराचा अंदाज लावला होता. परंतु त्यापेक्षा भारताचा विकासदर जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन…
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जीडीपीचे आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार 2023-24 एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत विकासदर 7.8 टक्के राहिला आहे. गेल्या चार तिमाहीतील हा सर्वाधिक विकासदर आहे.
मला वाटलं विखे भाजपात काम करतील की नाही… चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?
अनेक अर्थतज्ज्ञांनी विकासदर 7. 7 टक्कापर्यंत राहिल, असा अंदाज वक्त केला. करोनाच्या काळामध्ये विकासदर घटला होता. त्यानंतर 2022 मधील पहिल्या तिमाहीत जीडीपाचा वाढीचा दर सर्वाधिक 13.1 टक्के होता. तर 2023 मध्ये विकासदर हा 6. 1 टक्के राहिला आहे.
पंतप्रधानपदासाठी भाजपाकडे दुसरा चेहरा कोण? ठाकरेंच्या प्रश्नावर शिंदेंचं सडेतोड उत्तर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताचा विकासदर आठ टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. तर पुढील आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6. 5 टक्के राहिल, असा अंदाज आहे.
जीडीपी कशाने वाढला ?
देशांतर्गत मागणी, सरकारकडून होत असलेल्या मोठी गुंतवणूक यामुळे भारताचा जीडीपी वाढत असल्याचे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. एकीकडे जीडीपी वाढत असला तरी महागाईही वाढ आहे. देशातील महागाईदर 7. 4 टक्के इटका आहे.
ग्रामीण भागात फटका
भारताचा विकासदर वाढत असला तरी पुढील तिमाहीमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाला हंगामाला फटका बसला असल्याने ग्रामीण भागात विकास कमी राहिल, असा अंदाजही काही संस्थांनी व्यक्त केला आहे.