Stock Markets : शेअर बाजाराची संथ सुरुवात; निफ्टी 25,100च्या पातळीवर, कोणते शेअर्स घसरले?

  • Written By: Published:
Stock Markets : शेअर बाजाराची संथ सुरुवात; निफ्टी 25,100च्या पातळीवर, कोणते शेअर्स घसरले?

Share Market Update Today : आज भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स-निफ्टी घसरत आहेत. सेन्सेक्स 100 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. निफ्टी जवळपास 40 अंकांनी घसरत होता. निफ्टी बँकही जवळपास 200 अंकांनी घसरत होता.

कोलकाता डॉक्टर बलात्कार अन् हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पीडितेच्या पालकाचा पोलिसांवर गंभीर आरोप

सेन्सेक्स 30 अंकांच्या घसरणीसह 82,171 वर उघडला. निफ्टी 52 अंकांच्या घसरणीसह 25,093 वर तर बँक निफ्टी 273 अंकांच्या घसरणीसह 51,200 वर उघडला. बँकिंग आणि NBFC शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

बाजारातील घसरणीचे कारण काय?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीचा आकार आणि गती निश्चित करु शकणाऱ्या नोकऱ्यांबाबतचा अहवालापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे बाजारात आज सुरुवातीला मोठी घसरण झाली. एनर्जी आणि बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

Mumbaicha Dabewala : आता केरळच्या शाळांमध्ये शिकवला जाणार मुंबईच्या डबेवाल्यांचा धडा

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर्सची पुन्हा विक्री सुरु केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी ५ सप्टेंबर रोजी ६८८ कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ विक्री केली. तर याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २,९७० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube