भारतीय लोकांचा ‘मनोरंजना’वरच अधिक खर्च, सर्व्हेक्षणातून माहिती समोर
Indians Spending : सोशल मीडियावर सध्या एक सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सर्वेक्षणात भारतीय लोकांच्या खर्चाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला असून लोकांचा अन्नावरील खर्च कमी झाला आहे. या सर्वेक्षणानुसार आता भारतीय लोक अन्नावरील खर्चाऐवजी इतर खरेदी आणि मनोरंजनाच्या खर्चावर अधिक खर्च झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
जरांगेंनी काल जे काही केलं तो तमाशा होता, त्यामुळे समाजाची बदनामी; बारस्करांचा हल्लाबोल
या सर्वेक्षणानुसार गेल्या १० वर्षात भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला असून लोकं आता कपडे, टेलिव्हिजन सेट आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर जास्त खर्च करत आहेत. यामुळे बाजारात खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील लोकांच्या महिन्यांच्या खर्चात खाण्यापिण्याच्या गोष्टींवर कमी खर्च करण्यात आला आहे.
झनक आणि अनिरुद्ध यांच्या विवाहाचे सत्य अखेर सर्वांसमोर; ‘या’ व्यक्तीने केला खुलासा
ग्रामीण भागातील मासिक खर्चात खाण्यापिण्याच्या गोष्टींवर २०११-१२ मध्ये ५३ टक्के होता, तो आता ४६.४ टक्के आहे. तर शहरी भागात हाच खर्च या कालावधीत ४२.६ टक्क्यांवरून ३९.२ टक्क्यांवर आला आहे. या कालावधीत शहरी भागात इतर खर्च ५७.४ टक्क्यांवरून वाढून चक्क ६०.८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर ४७ टक्क्यांवरून चक्क ५३.६ टक्क्यांवर ग्रामीण भागात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप कराल तर; जरांगे व विरोधकांना शेलारांचा थेट इशारा
हा सर्व्हे ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, 2011-12 मध्ये सुमारे 2,630 रुपये सरासरी मासिक दरडोई ग्राहक खर्च होता, तो आता अंदाजे 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर ग्रामीण भागात हा आकडा 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत गेला आहे.
दरम्यान, सर्वेक्षणाच्या या आकडेवारीनुसार भारतीय लोकं आज अन्नावर कमी तर प्रवास आणि इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. ही माहिती सरकार किरकोळ महागाई आणि GDP मोजण्यासाठी वापरते.