जरांगेंनी काल जे काही केलं तो तमाशा होता, त्यामुळे समाजाची बदनामी; बारस्करांचा हल्लाबोल
Ajay Maharaj Barskar : काल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांचा मला जीवे मारण्याचा कट आहे, असं जरांगे म्हणाले. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनीही यावर प्रतिक्रिया देत जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी काल जे केले तो तमाशा होता, असं बारस्कर महाराज म्हणाले.
आयुष्मान खुरानाने अभिनय कारकिर्दीबद्दल सांगितली खास गोष्ट; म्हणाला, मला दुसरी संधी…
आज माध्यमांशी बोलतांना बारस्कर महाराज म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी काल जे केले तो तमाशा होता. त्यामुळं मराठा समाजाची बदनामी झाली आहे. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. याउलट माझ्यावर व्यक्तिगत आरोप केले. त्यासाठी त्यांनी माफी माागावी. मी त्यांना जे प्रश्न विचारले, ते सर्व आरक्षणासंबंध होती. त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुम्ही पारदर्शकतेचा भंग केल्याचा आरोप मी केला होता. त्याला उत्तर द्या, माझी भूमिका समाजाप्रती सकारात्कम असल्याचं अजय बारस्कर म्हणाले.
वडील कारगिल युध्दात लढले अन् मुलगा रांची कसोटीत टीम इंडियाचा हीरो
बारस्कर महाराज म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी आता माझ्यावर आरोप केले आहेत. मात्र, त्यांनी माझी माफी मागायला हवी होती. त्यांनी ती माफी मागितली नाही. त्यांनी माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही किंवा खंडनही केले नाही. उत्तर देण्याऐवजी मला धमक्या दिल्या जात आहेत, अपमानित केले जात आहे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी सत्य माडंत आहे. मी वारंवार आक्षेप घेतला, प्रश्न विचारले, याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यांनी माझ्यावर बलात्कार आणि पैसे घेतल्याचा आरोप केला. पण मी जाहीरपणे सांगतो, माझी नार्को टेस्ट करा, मी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. नेतृत्व कसं नसावं हे काल पाहिलं. कालचा संपूर्ण प्रकार तमाशा होता. माझ्याकडून आडमुठेपणा झाल्याचा कबुलीही जरांगे यांनी दिल्याचे बारस्कर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हेकेखोरपणा आणि आतताईपणा करतात, हे मी आधीच सांगितल होतं. कालचे आंदोलन पाहिले तर त्याचा प्रत्यय येत असल्यचाी टीका बारस्कर यांनी केली, कालचे पाहिल्यानंतर जी कोट्यावधींची लोकसंख्या होती, ती 200 वर पोहोचल्याचेही बारस्कर महाराज म्हणाले. आता कालच्या भूमिकेमुळे समाजाची बदनामी होत आहे. राज्यातील सर्व नेते तुमच्यावर टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा माझा एक फोटो ट्रोल होत आहे. त्यावरून मी फडणवीसांचा माणूस असल्याची टीका होते. मात्र, मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मी निवडणुसाठी तिकीट मागायला गेलो नव्हतो. त्या फोटोत इतरही मंडळी दिसत आहे. ते सर्वजण पुण्याचे आहेत. आरक्षणाची मागणी घेऊनच आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आरक्षण मारूतीच्या मंदिरात मिळत नाही, असं म्हणत बारस्कर महाराजांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर निशाणा साधला.