वडील कारगिल युध्दात लढले अन् मुलगा रांची कसोटीत टीम इंडियाचा हीरो
Dhruv Jurel : रांची कसोटी (IND Vs ENG) भारतीय संघाने 5 विकेटने जिंकली आहे. या विजयासह इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांची कसोटी मालिकाही टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. या मालिकेतील टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). ही कसोटी 5 विकेटने जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्याच्या दोन्ही डावात त्याने फलंदाजीत महत्त्वाचे योगदान दिले. या कसोटीत टीम इंडियासाठी त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
पहिल्या डावात टीम इंडियाने 177 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या, तेव्हा जुरेलने खालच्या फळीतील फलंदाजांसह छोट्या आणि महत्त्वपूर्ण भागीदारी करत टीम इंडियाला 300 च्या पुढे नेले. ध्रुव जुरेलच्या खेळीमुळेच भारतीय संघ इंग्लंडला आव्हान देण्याच्या स्थितीत पोहचला. भारताच्या पहिल्या डावात जुरेलने 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 90 धावा केल्या.
IND vs ENG : इंग्लंडला नमवलं! गिल-जुरेलच्या खेळीने टीम इंडियाने 17 वी मालिका जिंकली
यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या 120 धावांत 5 विकेट्स गमावून भारतीय संघ बॅकफूटवर असताना शुबमन गिलच्या साथीने जुरेलने भारताला विजय मिळवून दिला. जुरेलने दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा केल्या.
वडील कारगिल युद्धात लढले
रांची कसोटीत भारतीय संघाकडून विजयाचा नायक ध्रुव जुरेल राहिला. त्याच्या इनिंगने टीम इंडियाची इज्जत वाचवली असे म्हणता येईल. एका बाजूला विकेट पडत असताना त्याने भारताचा डाव सावरला आणि विजय मिळवून दिला. त्यांचे वडीलही कारगिल युद्धात असेच खंबीरपणे लढले होते.
Article 370: ‘आर्टिकल 370’च्या निर्मात्यांना मोठा झटका, ‘या’ ठिकाणी घातली बंदी
दरम्यान, 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झाले होते. ध्रुव जुरेलचे वडील नेम सिंह यांनीही या युद्धात भाग घेतला होता. त्यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे. सध्या ते निवृत्त आहेत पण कारगिल युद्धादरम्यान त्यांनी भारताच्या सीमांचे रक्षण केले होते.