आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, फोटो व्हायरल

PM Narendra Modi met Vaibhav Suryavanshi : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी वयात शतक झळकवणारा राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सुर्यवंशी याची पटना विमानतळावर (Patna Airport) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भेट घेतली आहे. यावेळी वैभव सुर्यवंशीचे (Vaibhav Suryavanshi) कुटुंबही उपस्थित होते. या भेटीचे काही फोटो पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केले आहे.
हे फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ‘पाटणा विमानतळावर, तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे! त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.’ या भेटीदरम्यान वैभव सुर्यवंशी याने पंतप्रधान मोदी यांचे पाय स्पर्श करत आशीर्वाद घेतले.
At Patna airport, met the young cricketing sensation Vaibhav Suryavanshi and his family. His cricketing skills are being admired all over the nation! My best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/pvUrbzdyU6
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) वैभव सुर्यवंशीला 1.1 कोटी रुपये खर्च करून संघात घेतले होते. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना वैभव सुर्यवंशीने 7 सामन्यांमध्ये 206.56 च्या स्ट्राईक रेटसह 252 धावा केल्या. या दरम्यान त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही केले. वैभव आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडूही ठरला आहे.
#WATCH | At Patna airport, PM Narendra Modi met the young cricketing sensation Vaibhav Suryavanshi and his family.
“His cricketing skills are being admired all over the nation! My best wishes to him for his future endeavours,” tweeted PM Modi pic.twitter.com/DAmYuD8Y2t
— ANI (@ANI) May 30, 2025
‘ही’ एक लाचार प्रवृत्ती; राम सातपुतेंची रणजितसिंह मोहितेंना खिजवले !