देश तुमच्या बापाचा माल आहे का? निलेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

  • Written By: Published:
देश तुमच्या बापाचा माल आहे का? निलेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

2009 ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. देश तुमच्या बापाचा माल आहे का? असं म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राणे यांनी एक ट्विट करून जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांना आता लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. राहुल गांधी हे 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. त्यांना 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करावा लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे.

लेट्सअप विशेष : राहुल गांधींना राजकारण कळतं?

त्याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की “२००९ ला मी खासदार झालो तेव्हा राहुल गांधी दुसऱ्यांदा खासदार झाले पण त्यांना मंत्री कॅटेगिरीचा बंगला मिळाला. AICC व IYC ऑफिस शासकीय बंगल्यात आहेत. सोनिया गांधी ज्या घरात राहतात ते घर भारताच्या पंतप्रधानांकडे असलं पाहिजे पण त्या आजही तिथे राहतात. देश तुमच्या बापाचा माल आहे का?”

राहुल गांधीकडे कोणता बंगला

राहुल गांधी हे 2004 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आले त्यांनतर त्यांना 12, तुघलक लेन बंगला देण्यात आला. मात्र आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे, यामुळे त्यांना आता हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.

निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube