Karnataka : सिद्धरामय्या-शिवकुमारांचे 8 शिलेदार; काँग्रेसाध्यक्षांच्या पुत्रासह माजी केंद्रीय मंत्री ते व्यापाऱ्याचा समावेश

Karnataka : सिद्धरामय्या-शिवकुमारांचे 8 शिलेदार; काँग्रेसाध्यक्षांच्या पुत्रासह माजी केंद्रीय मंत्री ते व्यापाऱ्याचा समावेश

Karnataka : काँग्रेसचे (Congress)ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah)यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी 2013 ते 2018 दरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister)होते. सिद्धरामय्या यांच्याबरोबरच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar)यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi)पोहोचले होते. याशिवाय इतर अनेक पक्षांचे विरोधी पक्षनेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्याबरोबच आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामध्ये जी परमेश्वर(G Parmeshavar), प्रियांक खर्गे(Priyank Kharge), केएच मुनियप्पा(KH Muniyappa), केजे जॉर्ज(KJ George), एमबी पाटील(MB Patil), सतीश जारकीहोली, रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांचा समावेश आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

‘आधी पोलीस प्रशासनात दबदबा तर निर्माण करा’; अजितदादांनी टोचले फडणवीसांचे कान

जी परमेश्वर
जी परमेश्‍वर हे कर्नाटक काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. एचडी कुमारस्वामी यांच्या मागील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. याशिवाय जुन्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. नुकतीच सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी शर्यत सुरु होती. त्यातच जी परमेश्वरांचंही नाव पुढे आलं होतं. त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले होते की, गेल्या आठ वर्षात मी खूप मेहनत केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. ते सर्वांना माहिती आहे.

प्रियांक खर्गे
प्रियांक खर्गे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव आहेत. ते कर्नाटकातील चित्तापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. सिद्धरामय्या यांच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले होते. तेव्हा ते सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री होते, तेव्हा ते 38 वर्षांचे होते. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही झाले. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत प्रियांकने भाजपचे मणिकांत राठोड यांचा पराभव केला होता. 2018 मध्येही त्यांनी चित्तापूरमधून निवडणूक जिंकली होती.

2009 मध्ये चित्तापूरच्या पोटनिवडणुकीने निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात झाली. पण नंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2013 मध्ये निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले. प्रियांक खर्गे यांनी युवक काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना एनएसयूआयचे सरचिटणीस होते. पुढे कर्नाटक युवक काँग्रेसचे उपाध्यक्षही निवडून आले. युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही त्यांनी निवडणूक लढवली होती. पण पराभूत झाले.

केएच मुनिअप्पा
75 वर्षीय केएच मुनियप्पा हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री राहिले आहेत. कोलार येथून सलग 28 वर्षे लोकसभेचे खासदार होते. 2019 च्या निवडणुकीत भाजप नेते एस मुनीस्वामी यांचा पराभव झाला होता. कर्नाटकातील देवनहल्ली विधानसभा मतदारसंघातून ते 4 हजार 631 मतांनी विजयी झाले आहेत. मुनियप्पा यांना 73, 058 मते मिळाली. त्यांनी त्यांच्या JD(S) चे LN नारायण स्वामी यांचा पराभव केला होता.

केजे जॉर्ज
जॉर्ज हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. एचडी कुमारस्वामी आणि सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. जॉर्ज 1968 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द 1969 मध्ये सुरु झाली, जेव्हा त्यांची गोनीकोप्पल शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. वीरेंद्र पाटील सरकारच्या काळात त्यांनी परिवहन, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्रीपदही भूषवले आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा सर्वात विश्वासू माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.

एम.बी. पाटील
एम.बी. पाटील हे कर्नाटकचे गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री राहिले आहेत. काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम.बी. पाटील हे माजी मुख्यमंत्री आणि सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय आहेत. पक्षातील प्रमुख लिंगायत नेते आणि डीके शिवकुमार, पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते.

सतीश जारकीहोळी
जारकीहोळी हे काँग्रेसचे नेते तसेच व्यापारी आहेत. जारकीहोळी यांचे दोन भाऊ रमेश जारकीहोळी आणि बालचंद्र जारकीहोळी हे देखील आमदार आहेत. सतीश जारकीहोळी यांचा जन्म 1962 मध्ये कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात झाला. ते तिथून निवडणूक लढवतात.

रामलिंगा रेड्डी
रामलिंगा रेड्डी हे कर्नाटक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. ते 2 सप्टेंबर 2017 ते 17 मे 2018 पर्यंत गृहराज्यमंत्री आणि 18 मे 2013 ते 2 सप्टेंबर या काळात कर्नाटकचे परिवहन मंत्री राहिले आहेत. रेड्डी 1973 मध्ये एनएसयूआयमध्ये दाखल झाले.

जमीर अहमद खान
जमीर अहमद खान हे कर्नाटकातील चामराजपेट मतदारसंघातून चारवेळा आमदार झाले आहेत. नॅशनल ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत. यावेळी त्यांनी चामराजपेट मतदारसंघातून 53953 मतांनी विजय मिळवला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube