Karnataka Polls : आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडे किती पैसा ? आकडे वाचून बसेल धक्का !
Karnataka Polls 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Polls 2023) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. देशाती सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 हजार 609 कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे असल्याचे म्हटले होते.
जर एखाद्या मंत्र्याचीच संपत्ती इतकी अफाट असेल तर या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती असेल, असा प्रश्न पडला असेल. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती जाहीर केली आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यंदा म्हैसूर प्रदेशातील वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांनी शपथपत्रात आपली एकूण संपत्ती 19.01 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता 9.43 कोटी रुपये आहे. तसेच त्यांच्यावर 6.84 कोटींचे दायित्व आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश
यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांनी शपथपत्रात त्यांच्याकडे एकूण 28.93 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यामध्ये 5.98 कोटी रुपये चल संपत्ती आहे. तर 22.95 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्यावर 5.79 कोटी रुपयांची दायित्वेही आहेत.
अफाट संपत्तीचा मालक
कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 हजार 609 कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काल सोमवारी होसकोटे मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Karnataka Election : भाजपची स्टार प्रचारक यादी जाहीर; फडणवीस गेमचेंजर ठरणार?
नागाराजू यांची पत्नी गृहिणी आहे. नागाराजू यांच्याकडे 536 कोटींची चल संपत्ती आहे. तर 1 हजार 73 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नागाराजू सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांनी याआधी 2020 मध्ये विधानपरिषद निवडणूक लढतेवेळी 1 हजार 220 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले होते.
नागाराजू यांच्या एकूण संपत्तीत त्यांच्या स्वतःकडे 64 लाख 89 हजार 302 रुपये रोख तर पत्नीकडे 34 लाख 29 हजार 445 रुपये रोख आहेत. बँकेतील खात्यात 20 कोटी 12 लाख 31 हजार 11 रुपये डिपॉझिट स्वरुपात आहेत. तसेच 33 कोटी 8 लाख 1 हजार 765 रुपये फिक्स डिपॉजिट केले आहेत. 6 कोटी 16 लाख 47 हजार 987 रुपये पत्नीच्या नावे बँक खात्यात डिपॉजिट आहेत. तर आणखी जवळपास दोन कोटी रुपये मुदत ठेव स्वरुपात गुंतवले आहेत.