मंत्र्याचं नाव छापलं नाही, आमंत्रणही दिलं नाही दोन अधिकाऱ्यांना मिळाली ‘जबर’ शिक्षा

मंत्र्याचं नाव छापलं नाही, आमंत्रणही दिलं नाही दोन अधिकाऱ्यांना मिळाली ‘जबर’ शिक्षा

Karnataka News : काँग्रेसशासित कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापले नाही. तसेच त्यांना पंचायत इमारतीच्या उद्घाटनालाही बोलावले नाही म्हणून दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मूडबिद्री तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी दयावती आणि इरुवेल ग्रामपंचायत विकास अधिकारी कांथाप्पा यांना निलंबित केले आहे.

इरुवेल ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन पत्रिकेवर मंत्री खर्गे यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले म्हणून ही कारवाई करण्यात आली. सोमवारी या इमारतीचे उद्घाटन होणार होते. नावे छापण्याच्या क्रमवारीचे पालन केले नाही म्हणून या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला, अशी माहिती दक्षिण कन्नड जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के यांनी दिली.

मानहानी प्रकरणात राहुल गांधींचे सुप्रीम कोर्टात उत्तर; ‘मोदींनी माझे भाषण ऐकले नाही’

निलंबनाचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. जर सरकारने त्यावर सकारात्मक विचार केला तर निलंबन मागे घेण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही आनंद यांनी सांगितले. मंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, या कार्यक्रमाला मंत्री उपस्थित राहण्याचा विषय नाही. निमंत्रण पत्रिका छापल्यावर प्रोटोकॉल पाळावा लागतो. केवळ छपाईच नाही मंत्रीही असणे आवश्यक आहे. कार्डवर नावे छापल्यानंतर वैयक्तिकरित्य आमंत्रित केले जाते.

याआधी मूडबिद्रीचे आमदार उमानाथ कोटियन यांनी आंदोलन करण्याचा इशारा देत निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रभारी मंत्री नवीन पंचायत इमारतीचे उद्घाटन करतील असे या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मिळाल्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

वडेट्टीवारांनाच विरोधी पक्षनेता का केलं? बाळासाहेब थोरातांनी खरं काय सांगूनच टाकलं

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube