Karnataka Assembly election : फडणवीस मराठी भाषिकांविरोधात मैदानात उतरलेत, पवारांचे टीकास्त्र

Karnataka Assembly election : फडणवीस मराठी भाषिकांविरोधात मैदानात उतरलेत, पवारांचे टीकास्त्र

Karnataka Assembly election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिक उमेदवारांच्या विरोधात मैदानात उतरलेत ही चांगली गोष्ट नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांवर केली आहे. सोलापूरातील पंढरपूरमध्ये शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

एटीएसने लखनौ येथून दोन पीएफआय एजंटला केले अटक, गुप्तचर यंत्रणेची चौकशी सुरु

येत्या 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सत्तेत असलेल्या भाजपकडून जोरदार रणनीती आखण्यात आल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीसाठी भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी मैदाना उतरवल्याचं पाहायला मिळालं होतं.

आधी शिवसेनेचं अस्तित्व उभं करा मग…; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कर्नाटक निवडणुकीसाठी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात उतरल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्राच्या उमेदवारांविरोधात मैदानात उतरणं, ही गोष्ट काही चांगली नसल्याचं पवारांनी म्हटलंय.

हेलिकॉप्टर घेऊन महाराष्ट्र पेटवणार का?; ठाकरेंच्या टीकेवर राणेंचा खोचक सवाल

तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा बाहेरील लोकांवर अनेक अत्याचार झालेत आणि ही गोष्ट जेव्हा त्या महाराष्ट्रीयन लोकांना कळेल तेव्हा त्यांना आणखीनच दुख: होणार असल्याचं पवारांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी बोलताना पवारांनी इतर विषयांवरही भाष्य केलंय.

राज्यात काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. अशातच लवकरात लवकर पंचनामे करुन मदत देण्याबाबतचं काम सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. पण राज्यातल्या एकाही नूकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube