भारीच..! दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन; ‘या’ योजनेसाठी अर्ज कसा अन् कुठे करायचा?

भारीच..! दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन; ‘या’ योजनेसाठी अर्ज कसा अन् कुठे करायचा?

PM Shram Yogi Mandhan Yojana : भारत सरकार मजुरांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन देते. सरकारची अशी कोणती योजना आहे ज्या अंतर्गत मजुरांना दरमहा तीन हजार रुपये मिळतात? या योजनेसाठी कोण पात्र होऊ शकतो? या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत. केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. या सरकारी योजनांचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होत आहे. देशातील गरीब आणि ज्यांना सरकारी मदतीची खरी गरज आहे अशा लोकांना डोळ्यांसमोर ठेवून सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत.

भारतात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या अजूनही जास्त आहे. या कामगारांचे उत्पन्न आणि पेन्शन काहीच स्थिर नसते. अशा लोकांची मदत करण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातात. मजुरांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याची माहिती जाणून घेऊ या..

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी २००९ मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana) सुरू केली होती. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षानंतर सरकारकडून तीन हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतात. या योजनेत जितके योगदान मजुरांकडून दिले जाते तितकेच पैसे सरकारही या योजनेसाठी देते. उदा. एखाद्याने जर १०० रुपये जमा केले तर सरकारही त्यात १०० रुपये जमा करणार.

मोठी बातमी! क्रेडिट, डेबिट कार्ड, बँक, पोस्ट ऑफिस योजनांच्या नियमांमध्ये 1 ऑक्टोबरपासून होणार बदल

योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचे वय १८ ते ४० दरम्यान असावे. कारण कमीत कमी २० वर्षांपर्यंत योजनेत योगदान देता येईल. ६० वर्षे वयानंतर सरकार दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देते. जितक्या लवकर या योजनेत सहभाग घेतला जाईल तितका प्रीमियम कमी द्यावा लागेल.

कुणाला मिळेल लाभ

पीएम श्रमयोगी मानधन योजनेत फक्त असंघित क्षेत्रात काम करणारे कामगारच अर्ज करू शकतात. यामध्ये रिक्षा चालक, घरकाम करणारे, ड्रायवर, प्लंबर, फेरीवाले, मिड डे मिल वर्कर, बांधकाम कामगार मजूर, शेतात काम करणारे कामगार यांसह अन्य संघटित क्षेत्रातील मजूर सहभागी होऊ शकतात.

अर्ज कसा करायचा

या योजनेत अर्ज करण्यासाठी मजुरांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागेल. यानंतर तुमच्याकडील आधार कार्ड आणि बँक डिटेलसह या योजनेत नोंदणी करू शकता. बँक खात्याशी फोन नंबर लिंक असणे गरजेचे आहे. खाते उघडल्यानंतर याबाबतची माहिती मोबाईलवर पाठवली जाते. या योजनेत प्रिमियमची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून डेबिट होत राहते. योजनेत पहिला हप्ता मात्र रोख स्वरूपात द्यावा लागतो. यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यातून प्रमियमची रक्कम वजा होत राहते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८००२६७६८८८ वर कॉल करून माहिती घेत येते.

लाडकी बहीण योजना अडचणीत! प्रतिज्ञापत्र सादर करा, हायकोर्टाचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube