‘नीट’ चा मुद्दा उपस्थित करताच राहुल गांधींचा माईक केला बंद; लोकसभा अध्यक्षांचं ‘अजब’ उत्तर
Rahul Gandhi speaker off In Lok Sabha : नवं सरकार स्थापन झालं नव्हत तेव्हापासून देशात नीट पेपरफुटीचं प्रकरण गाजतंय. हे प्रकरण थेट संसदेतही पोहोचलं आहे. सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) हे विरोधी पक्षनेते झाल्यापासून बरेच सक्रिय झाले आहेत. दरम्यान, निट पेपर लीक प्रकरणावर संसदेत प्रश्न मांडताना राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला. ( NEET Per Leak) यासंदर्भातील व्हीडिओच त्यांनी आपल्या एक्स (ट्विटर) खात्यावरून शेअर केला आहे.
माझ्याकडे बटन नाही Jalna Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार
या प्रकरणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधींनी मायक्रोफोन वापरण्याची परावनगी मागितली. त्यावर खासदारांचे मायक्रोफोन बंद केले जात नाहीत आणि माझ्याकडे असं कोणतंही नियंत्रण नाही, असं ओम बिर्ला यांनी राहुल गांधींच्या प्रश्नावर उत्तर दिलं. चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर व्हायला हवी. इतर बाबी सभागृहात नोंदवल्या जाणार नाहीत, असंही बिर्ला यांनी पुढे स्पष्ट केलं. त्यावर सभागृहात एकच गदारोळ झाला.
काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया Jalna Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार
एकीकडे नरेंद्र मोदी नीटवर काहीही बोलत नसताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात तरुणांचा आवाज उठवत आहेत. मात्र, एवढ्या गंभीर मुद्द्यावरून तरुणांचा आवाज दाबण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. माईक बंद करण्यासारखी कृत्ये केली जात आहेत, असं काँग्रेसने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे.
राहुल गांधींनी शेअर केला व्हीडिओ
NEET परीक्षेत पेपर लीक झाला आणि लोकांनी हजारो- कोट्यवधी रुपये कमावले. त्या सर्व विद्यार्थ्यांची स्वप्नं आणि आकांक्षा उद्ध्वस्त करून थट्टा सुरू आहे. त्यामुळे काल विरोधी पक्षाच्या बैठकीत मी विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, मला बोलू दिलं गेलं नाही. त्यामुळे ७ वर्षांत ७० वेळा २ कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. प्रचंड भ्रष्टाचार आहे. आपण हे चालू ठेवू शकत नाही. पंतप्रधानांना चर्चा नको असते, हे दुर्दैव आहे असंही राहुल गांधी म्हणाले.
निट पेपर लीक प्रकरणावर संसदेत प्रश्न मांडताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला. त्यावर प्रश्न विचारला असता, लोकसभा अध्यक्षांनी माझ्याकडं माईक बंद करण्याचं बटन नाही असं उत्तर दिलं.#LokSabhaSpeaker #neet2024scam #RahulGandhi pic.twitter.com/EbnpNteoE5
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 29, 2024