राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा राहुल गांधींकडून दाखला; आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवर केलं भाष्य

राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा राहुल गांधींकडून दाखला; आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवर केलं भाष्य

Rahul Gandhi Tweet on Reservation :  राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे. दरम्यान आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर भाष्य केलं आहे. (Rahul Gandhi ) राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९०२ रोजी समाजातील दुर्बल घटकांना नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्याचा दाखला देत लोकसभेतील राहुल गांधी यांनी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली आहे.

आजपासून पॅरिस स्पर्धेत भारताची बॅडमिंटन मोहिम; पी. व्ही. सिंधूची नजर सलग तिसऱ्या पदकावर

या संदर्भात राहुल गांधी यांनी आपल्या ‘एक्स’ ‘(ट्वीट) वर एक पोस्ट करत ही मागणी केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सामाजिक न्यायासाठी राजर्षी शाहू महाराजांचं योगदान त्यांच्या काळाच्याही खूप पुढे होतं. देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते अग्रणी होते. सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या आजीवन कार्याचा माझ्यावरही मोठा प्रभाव पडला आहे असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

५० टक्के आरक्षण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच नवीन घरात; ५ सुनहरी बाग असणार नवा पत्ता 

राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी ‘करवीर संस्थानचे गॅझेट’ प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण केलं. त्याच दिवशी राजर्षी शाहू महाराज यांनी सरकारी नोकरीत समाजातील दुर्बल घटकांसाठी ५० टक्के आरक्षण देऊन या घटकांना बळ देण्याचं काम केलं. राजर्षी शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडल्याने त्यांनी ‘संविधानात’ आरक्षणाचा समावेश केला. जातीय जनगणना करून आरक्षणातील ५० टक्के मर्यादा काढून टाकणं आणि उपेक्षितांसाठी न्याय, या आमच्या मागण्या राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

सामाजिक न्यायासाठी राजर्षी शाहू महाराजांचे योगदान त्यांच्या काळाच्या खूप पुढं होतं. देशातील सामाजिक न्यायाच्या लढ्यात एक अग्रणी, सामाजिक सुधारणांच्या त्यांच्या आजीवन कार्याचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये याच दिवशी ‘क्रांतिकारक राजपत्र’ प्रकाशित करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण सार्वत्रिक केलं. तसंच शाहू महाराजांनी 50% नोकरीत आरक्षण देऊन समाजातील दुर्बल घटकांना बळ देण्याचं काम केलं. शाहू महाराजांच्या पाठिंब्याचा आणि प्रयत्नांचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर संविधानात आरक्षणाचा समावेश करण्यात आला. जातीय जनगणना, आरक्षणावरील ५०% मर्यादा काढून टाकणं आणि उपेक्षितांसाठी न्याय या आमच्या मागण्या शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शांनी प्रेरित आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube