प्रेयसी अन् तिच्या दोन मुलींना गोदावरी नदीत ढकललं; लिव्ह इन पार्टनरचे धक्कादायक कृत्य

प्रेयसी अन् तिच्या दोन मुलींना गोदावरी नदीत ढकललं; लिव्ह इन पार्टनरचे धक्कादायक कृत्य

अमरावती : लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसी आणि तिच्या दोन मुलींना गोदावरी नदीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशच्या कोनसीमा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत कीर्तना (13 वर्ष) ही पाईपला लटकल्याने बचावली आहे तर सुहासिनी (36) आणि जर्सी (1) या दोघी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या असून दोघांची शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (live-in partner pushed the girlfriend and her two daughters into the Godavari river)

नेमके काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुप्पला सुहासिनी नावाची महिला गुंटूरच्या ताडेपल्ली येथे राहत होती. मात्र पतीसोबत मतभेद झाल्याने ती विभक्त झाली. त्यानंतर मुलगी कीर्तनासोबत ती वेगळी राहू लागली. सुहासिनी ही उच्चशिक्षित असून एका कॉर्पोरेट हॉटेलमध्ये काम करत होती. या दरम्यान, 2 वर्षांपूर्वी तिची प्रकाशम जिल्ह्यातील दरसी येथील सुरेशशी भेट झाली. दोघेही एकत्र राहू लागले. सुहासिनी आणि सुरेश यांना एक मुलगी जर्सी (1) देखील आहे.

‘महिलांना राजनीतीची भाकरी बनवून शेकण्याचं काम’, अविश्वास प्रस्तावाला राणांचा कडाडून विरोध

पण काही दिवसांपूर्वी सुहासिनी आणि सुरेशमध्ये मतभेद झाले आणि सुरेशने सुहासिनी आणि मुली कीर्तना, जर्सी यांना मारुन टाकण्याचा कट रचला. शनिवारी सायंकाळी त्याने सर्वांना खरेदीसाठी कारमधून राजा महेंद्रवरमला नेले होते. खरेदीनंतर रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. रावुलापलेम गौथमी ब्रिजवर पोहोचल्यावर सेल्फीसाठी खाली उतरण्यास सांगितले. तो त्यांच्यासोबत पुलाच्या काठावर बसला. त्यानंतर रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अचनाक तिघींना नदीत ढकलून दिले. यात आई आणि जर्सी या दोघी वाहून गेल्या तर एका प्लास्टिकच्या पाइपला लटकून कीर्तनाने कसाबसा स्वतःचा जीव वाचविला.

चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणल्याचा कॉग्रेसला पश्चाताप होईल, किरेन रिजिजू यांची टीका

यानंतर कीर्तनाने रात्रीच्या अंधारात पाइपला लटकलेल्या अवस्थेत पँटच्या खिशातून मोबाइल काढून १०० क्रमांकावर फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा जीव वाचवला. त्यानंतर कीर्तनाने नेमके काय घडले याबाबतचा वृत्तांत पोलिसांना ऐकवला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघींना शोधण्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार केली आहे. तर दुसरी टीम आरोपीच्या शोधात आहे. दरम्यान, आई-बहीण वाहून गेल्यावरही कीर्तनाच्या धाडसामुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube