Lok Sabha 2024 : काँग्रेसचा मोठा डाव! लडाखमधून भाजपविरोधात तगडा उमेदवार
Lok Sabha Election 2024 : लडाख लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांना तिकीट नाकारत ताशी ग्यालसन यांना तिकीट दिले. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. काँग्रेसन आपले पत्ते उघड करत सेरिंग नामग्याल यांना उमेदवारी जाहीर केली. या घडामोडीनंतर आता भाजपाचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धक्कातंत्राची परिसीमा! भाषणावर प्रभावित झाले, टेबल बडवले त्याच खासदाराला मोदी-शाहंनी घरी बसवले
काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीने त्सेरिंग नामग्याल यांच्या नावाला मंजुरी दिली. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्रित निवडणुका लढत आहेत. जम्मू काश्मीरमधील दोन जागा आणि लडाखमधील एक जागा काँग्रेसला तर काश्मीरमधील तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सला मिळाल्या आहेत. जम्मूमधील दोन जागांवर नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तर काश्मीरमधील तीन जागांवर काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा घोषित केला आहे.
Congress announces candidate for Ladakh seat for Lok Sabha elections
Read @ANI Story | https://t.co/NXqQOgJkIp#Congress #Ladakh #LokSabhaElections2024 pic.twitter.com/t2DZsQh7jD
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2024
याआधी भाजपने लडाखचे विद्यमान खासदार त्सेरिंग नामग्याल यांचे तिकीट कापले होते. भाजप आपल्याला उमेदवारी देईल याची खात्री नामग्याल यांना होती. मात्र भाजपने येथेही धक्कातंत्राचा वापर करत त्यांना डच्चू दिला. त्यांच्या ऐवजी ताशी ग्यालसन यांना तिकीट दिले. ताशी ग्यालसन हे लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. भाजपाच्या या निर्णयावर खासदार नामग्याल यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
भाविकांसाठी आनंदाची बातमी! Amarnath Yatra ची नोंदणी सुरू; यंदा 52 दिवस चालणार यात्रा
यानंतर काँग्रेसने मोठा डाव खेळत खासदार नामग्याल यांच्या नावाशी साम्य असलेल्या सेरिंग नामग्याल यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. या निर्णयानंतर मतदारसंघातील निवडणूक रंगतदार झाली आहे. भाजपने ताशी ग्यालसन यांना तिकीट दिल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर स्थानिक नेते उपस्थित होते. परंतु, खासदार नामग्याल मात्र उपस्थित नव्हते. आता आगामी काळात मतदारसंघातील राजकारणात त्यांची काय भूमिका राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.