एलपीजी संकटाचा ‘सुरत’ ला फटका; कामगारांनी सोडले शहर, रेल्वे स्थानकावर लाठीचार्ज
Surat Railway Station : इराण, अमेरिका आणि इस्त्रायल दरम्यान झालेल्या युद्धाचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे.
Surat Railway Station : इराण, अमेरिका आणि इस्त्रायल दरम्यान झालेल्या युद्धाचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक व्यवसायावर देखील आता परिणाम होताना दिसत आहे. यातच गुजरातमधील सुरत शहराला एलपीजी संकटाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. इतर राज्यातील अनेक कामगार पलायन करताना दिसत आहे. यातच सोशल मीडियावर सुरत रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सुरत शहरात एलपीजी संकट वाढल्याने सुरतमधील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो लोक धावपळ करताना दिसत आहे. रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 च्या सुमारास उधना-हसनपूर ट्रेनसाठी प्रवासी रांगेत उभे असताना, काहींनी रांग तोडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळल्याने, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी लाठीचार्ज केला. या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जपासून वाचण्यासाठी प्रवासी लोखंडी सळ्यांवरून उड्या मारताना दिसत आहेत.
Gas Shortage Empties Surat as Workers Flee
A mass exodus is underway from Surat station in India’s Gujarat state, as a severe LPG shortage leaves migrant workers without jobs & food. #surat #LPG #IranWar pic.twitter.com/R12SEjXxMe
— Imran Shah (@imranmanzoorsha) April 19, 2026
रेल्वे अधिकारी अनुभव सक्सेना यांच्या म्हणण्यानुसार, दुपारपर्यंत सहा गाड्यांमधून 21000 हून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली होती, परंतु गर्दी इतकी प्रचंड होती की सुव्यवस्था राखणे कठीण झाले होते. प्रवाशांना रांगेत थांबण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले, परंतु गोंधळामुळे पोलिसांना कठोर उपाययोजना करण्यास भाग पडले. मोठ्या प्रमाणात स्थलांतर एलपीजी संकटामुळे गेल्या एक-दोन महिन्यांपासून कामगारांचे स्थलांतर सातत्याने सुरू आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि एलपीजी संकटामुळे प्रवाशांची संख्या दुप्पट झाली असून, रेल्वेच्या प्रयत्नांवर ताण आला आहे.
“अब नहीं आऊंगा दोस्त, अब नहीं आऊंगा”
गुजरात के सूरत स्टेशन से बड़ी संख्या में मजदूर लौट रहे हैं. क्योंकि गैस की किल्लत की वजह से वहां काम ही नहीं बचा.
इसके अलावा लोगों को खाने तक की दिक्कत हो रही है. भयंकर हालात हैं. pic.twitter.com/08gScyTLOK
— Ranvijay Singh (@ranvijaylive) April 19, 2026
रेल्वे अधिकारी अनुभव सक्सेना म्हणाले, “उन्हाळी हंगाम सुरू आहे आणि आम्ही प्रवाशांसाठी विशेष गाड्याही चालवल्या आहेत. आज आतापर्यंत सहा गाड्या चालवण्यात आल्या आहेत. पहिली गाडी पहाटे 1.30 वाजता उधनाहून जयनागरसाठी रवाना झाली. त्यानंतर, दुसरी गाडी सायंकाळी 5.30 वाजता उधनाहून मधुबनीसाठी रवाना झाली. आम्ही प्रवाशांच्या संख्येवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि रेल्वेने संपूर्ण व्यवस्था केली आहे.”
वस्त्रोद्योगाला मोठा फटका
गॅसच्या तुटवड्यामुळे सुरतच्या वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला आहे. जवळपास 3 लाख कामगार स्थलांतरित झाले आहेत, ज्यामुळे उत्पादन दररोज 65 दशलक्ष मीटरवरून 45 दशलक्ष मीटरपर्यंत कमी झाले आहे. उद्योगाला 15000 गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे, परंतु पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही तर आणखी कामगार सुरत सोडण्याची शक्यता आहे.