बहुचर्चित महादेव अॅप बेटिंग प्रकरण; माजी मुख्यमंत्र्यांवरच गुन्हा दाखल!
Mahadev App Case : बहुचर्चित महादेव अॅप बेटिंग प्रकरणी (Mahadev App Case) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) अडचणीत आले आहेत. भुपेश बघेल यांच्यावर रायपूर अर्थिक गुन्हे शाखेच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपेश बघेल यांच्यासह इतर सहकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महादेव अॅप बेटिंग प्रकरण चर्चेत आले आहे.
कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे मेष राशीचा आजचा दिवस
माजी मुख्यमंत्री बघेल यांच्यासह इतर सहकाऱ्यांविरोधात कलम १२० बी, ३४, ४०६, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूपेश बघेल यांच्यासह इतर २१ जणांविरुद्ध ४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपासून महादेव बेटिंग अॅप आणि त्यासंबंधी ईडीकडून होणार कारवाई चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री ईडीच्या रडारवर होत्या.
मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई : हिंसक आंदोलनांनंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय
ईडीने छत्तीसगडमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान मोठी कारवाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (2 नोव्हेंबर) ईडीने छत्तीसगडमधील महादेव बेटिंग अॅप प्रकरणात 5 कोटी 39 लाख रुपयांची रोकड जप्त केली. यामध्ये 15.59 कोटी रुपयांची बँक बॅलन्सही गोठवण्यात आली. यात बघेल यांचं नावही समोर आलं. महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचे ईडीचं म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचे ईडीचे सांगितलं.
दरम्यान, महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यात रणवीर कपूर, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी, हिना खान आणि कॉमेडियन कपिल शर्मा या कलाकारांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला. शाह यांनी बघेल यांना प्रीपेड सीएम म्हटलं होतं. छत्तीसगडमधील जनतेचे पैसे दिल्ली दरबारात पाठवण्याचे काम बघेल यांनी केले आहे. छत्तीसगडच्या तिजोरीवर दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा हक्क आहे. मात्र, बघेल यांनी एटीएम बनवून छत्तीसगडची तिजोरी दिल्लीतील भावा-बहिणींच्या चरणी अर्पण केल्याचा आरोप त्यांनी केला.