Manipur Violence : मणिपुरात भडकलेली आग विझेना! दोन्ही समुदायाकडून गोळीबार; 8 जण ठार

Manipur Violence : मणिपुरात भडकलेली आग विझेना! दोन्ही समुदायाकडून गोळीबार; 8 जण ठार

मणिपुरात गेल्या काही दिवसांपासून पेटलेली आग अद्यापही विझलेली दिसत नाही. गुरुवारी मणिपुरधील विष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यात पुन्हा कुकी आणि मैतेई समुदायातील नागरिकांमध्ये गोळीबाराची चकमक झाली. या गोळीबारात तब्बल 8 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूीवर ‘ही आपली भूमी नाही का?’ हे गीत लिहिणाऱ्या एका गीतकाराचा मृत्यू झाला आहे.

मला वाटलं विखे भाजपात काम करतील की नाही… चंद्रशेखर बावनकुळे असं का म्हणाले?

नेमकं काय घडलं?
गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कुकी आणि मैतेई समुदायाच्या नागरिकांकडून गोळीबार सुरु होता. मंगळवारी हिंसाचार सुरू झाला जेव्हा खोइरेंटक भागातील गोळीबारात सुमारे ३० वर्षांच्या एका तरुणाचा मृत्यू झाला, त्यानंतर दोन्ही समुदायाकडून मोठ्या प्रमाणात गोळीबाराची चकमक झाली. या गोळीबारामध्ये एकूण 8 जण ठार झाले आहेत. गोळीबारात मृत्यू झालेल्या नागरिकांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून त्यापैकी एकाचं नाव ए. एस.
मंगबोई असं आहे. मंगबोई हे एक गीतकार असून त्यांनी मणिपुर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘ही आपली भूमी नाही का?’ हे गीत लिहिलं होतं.

Adani OCCRP Report : आणखी एका रिपोर्टने वाढवलं अदानींचं टेन्शन; आरोप फेटाळत दिलं स्पष्टीकरण

मे महिन्यात मणिपुरात या हिंसाचाराला सुरुवात झाली. राज्यात मेईतेई समाजाला अनुसूचित जनजातीच्या श्रेणीत समाविष्ट करण्याच्या मागणी प्रश्नी ठिकठिकाणी संघर्ष सुरू आहे. मेईतेई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीविरोधात येथील स्थानिक जनजातीय समूहांद्वारे विरोध प्रदर्शने सुरू आहेत. विरोध इतका वाढत चालला आहे की आता राज्यातील 8 जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलं होतं. वातावरण अधिक चिघळू नये यासाठी सेना आणि अर्धसैनिक दलांना तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, नूकत्याचं झालेल्या गोळीबाराच्या घटनेवनंतर आता आयटीएलएफकडून चुराचंदपुरमध्ये बंदची हाक देण्यात आली. या भागातील पाणी पुरवठा आणि वैद्यकीय सेवा आदी अत्यावश्यक सेवांना बंदतून वगळण्यात आले आहे, असे ‘आयटीएलएफ’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube