इंग्रजांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतही पारतंत्र्य होत; वाचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास

  • Written By: Published:
इंग्रजांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतही पारतंत्र्य होत; वाचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास

Marathwada Mukti Sangram Din : मराठवाडा मुक्तीसंग्रामचा १९३८ ते १९४८ हा प्रमुख (Marathwada) कालखंड म्हणुन ओळखला जातो. याच काळात मराठवाडा निझामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकिय आंदोलने, विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील झाली. हा विरोध मोडून काढण्यासाठी हैद्राबादच्या निजामाने कासीम रझवी याच्या मदतीने रझाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; आज गणरायाला धुमधडाक्यात निरोप, प्रशासनही सज्ज

हैद्राबाद संस्थानाचा भाग

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनं स्वतंत्र भारतात विलीन झाली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वतंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते. त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला, तसंच अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं.

स्वामी रामानंद तीर्थ यांचं नेतृत्व

देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व केलं ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी. हैदराबाद संस्थानामध्ये त्याकाळात तेलंगणा, सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग येत असे आणि हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या तब्बल १ कोटी ६० लाख होती. मुक्ततेसाठी लढा सुरु असताना रझाकारांचे जनतेवर अत्याचार करणं सुरुच होतं. मात्र स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहचला.

जनतेचा मोठा प्रतिसाद

निजामाने या रझाकार संघटनेचा वापर करुन संस्थानातील नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा निजामाचा स्वतःचे राज्य टिकवण्याचा प्रयत्न होता. पण 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला अणखी चालना मिळाली. यातच निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणुन ७ ऑगस्ट रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणुन साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं. या आव्हानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात झाली.

Kargil War : गँग ऑफ फोर आणि मुशर्रफने रचला कारगिल युद्धाचा कट, काय आहे संपूर्ण कहाणी

हैद्राबाद संस्थानवर पोलीस बळाचा वापर

7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. त्यानुसार १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

जनतेचं मोठं योगदान

हैद्राबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले. तसंच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उधळुन लावला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेने मोठं योगदान दिलं. त्यानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या