मोबाईल, स्टील अन् औषधे स्वस्त होणार, ‘मदर ऑफ ऑल डील्स’ नंतर भारतीय बाजारपेठेत काय बदल होणार?
India-EU FTA : तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत आणि युरोपिय युनियनमध्ये जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार झाला आहे. पंतप्रधान
India-EU FTA : तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारत आणि युरोपिय युनियनमध्ये जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराला जागतिक व्यापारासाठी नवीन पहाट असं म्हटलंय. हा करार भारताला 27 नवीन देशांशी जोडणार असल्याने अनेक गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार आहेत. या करारामुळे भारतीय ग्राहकांना काय फायदा होणार याबाबत सविस्तर जाणून घ्या.
लक्झरी कार स्वस्त होणार
भारत आणि युरोपिय युनियनमध्ये झालेल्या करारानंतर आता भारतात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडी सारख्या लक्झरी कार्स स्वस्त होणार आहे. आतापर्यंत भारतात या कार्सवर 100 % पेक्षा जास्त आयात शुल्क आकारले जात होते मात्र आता या करारानुसार, 15 हजार युरो म्हणजेच 163 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवरील शुल्क 40 % पर्यंत कमी करण्यात येणार असून हे शुल्क हळूहळू 10 % पर्यंत आण्यात येणार असल्याने भारतात लक्झरी कार्स स्वस्त होतील.
प्रीमियम वाईन आणि व्हिस्की आता बजेटमध्ये
या कराराचा फायदा केवळ लक्झरी कार्संना होणार नसून या कराराचा फायदा फ्रान्स, इटली आणि स्पेनमधील प्रसिद्ध वाइनवर देखील होणार. या देशातील प्रीमियम वाईन आणि व्हिस्कीवर मोठ्या प्रमाणात कर कपात करण्यात येणार. सध्या भारतीय सरकार परदेशी वाइनवर 150 % पेक्षा जास्त कर लादतो मात्र या करारानंतर हे शुल्क 20 % पर्यंत कमी करण्यात येणार असल्याने याचा थेट फायदा ग्राहकांना होणार. पण ही कपात एकाच वेळी नाहीतर हळूहळू होणार आहे.
औषधे आणि वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या करारानंतर कर्करोग आणि इतर गंभीर आजारांसाठी परदेशी औषधे तसेच आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री देखील स्वस्त होणार. तर 27 युरोपीय देशांच्या बाजारपेठा भारतीय जेनेरिक औषधांसाठी खुल्या होतील.
इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय-टेक मशिनरी
देशात सध्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय-टेक मशिनरी महाग असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतोय मात्र आता या करारानंतर विमानाचे, मोबाईलचे पार्ट्स आणि हाय- टेक मशिनरीवर शुल्क रद्द केल्याने भारतात इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादनावर खर्च कमी होणार असल्याने याचा थेट फायदा ग्राहकांना होणार. याचा अर्थ असा की भारतात आता मोबाईल फोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होणार.
स्टील आणि रासायनिक उत्पादने
या करारात लोखंड, स्टील आणि रासायनिक उत्पादनांवर शून्य शुल्क प्रस्तावित असल्याने यामुळे बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील कच्च्या मालाच्या किमती कमी होतील, ज्यामुळे घर बांधणे किंवा औद्योगिक वस्तू खरेदी करणे स्वस्त होईल.
आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव अन् लेकीवरही जीवघेणा हल्ला, वाघोलीत धक्कादायक घटना…
तर दुसरीकडे भारतीय कापड, चामडे आणि दागिन्यांच्या व्यापाऱ्यांसाठी आता युरोपियन बाजारपेठ देखील खुली होणार आहे. भारतीय कापडांवरील शुल्क रद्द केल्याने भारत बांगलादेश आणि व्हिएतनामला मागे टाकून नंबर वन निर्यातदार बनण्यास मदत होऊ शकते.
